जालना ( प्रतिनिधी) : जालना शहर आणि ग्रामीण भाग यांना जोडणाऱ्या कुंडलिका नदीवरील पूल जीर्ण झाला असल्याने या पुलाचे रखडलेले काम तातडीने हाती घ्यावे. या करिता राष्ट्रीय समाज पक्ष मैदानात उतरला आहे . पक्षातर्फे जनमत संग्रह संकलित करण्यास आज प्रारंभ करण्यात आला .तथापि संपूर्ण शंभर गावांत जाऊन व्यापक स्वरूपात जनजागृती तसेच जनआंदोलनाची पार्श्वभूमी तयार करणार असल्याचे रासप नेते ओमप्रकाश चितळकर यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक, माजी मंत्री महादेव जानकर यांच्या आदेशानुसार तसेच रासपचे नेते ओमप्रकाश चितळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड .संभाजी चुनखडे यांनी पुणेगाव ता. जालना येथे शनिवारी (ता.26 ) पदाधिकारी व कार्यकर्त्यां समवेत जनमत संग्रह घेण्यास सुरुवात केली.
रोहनवाडी नजीक असलेल्या कुंडलिका नदीवरील पूल अर्धवट, बुजलेल्या स्थितीत आहे. पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते ,दरवर्षी दुचाकीसह तरुण वाहून गेल्याच्या घटना घडतात, पुलाच्या नुतनीकरणा अभावी अनेकांचे बळी गेले आहेत. सदर पुलाच्या दुरुस्तीसाठी पक्षातर्फे वारंवार लेखी निवेदने देण्यात आली .तरीही शासन व प्रशासनाचे सदर पुलाच्या दुरुस्तीबाबत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ओमप्रकाश चितळकर यांनी या वेळी बोलताना केला.पुलाची तातडीने दुरूस्ती करावी या करिता जनमत संग्रह संकलित करून शासनाचे लक्ष केंद्रित करणार असल्याचे ॲड. संभाजी चुनखडे यांनी सांगितले.
दरम्यान पुणेगाव, इस्लामवाडी, पोकळवडगाव, लोंढेवाडी ,रोहनवाडी येथे जाऊन जनमत घेतले. तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कुंडलिका नदीवरील पुलावर उभे राहून जनमत संकलित केले. या उपक्रमाचे ग्रामस्थ व नागरिकांनी जोरदार स्वागत केले असून आंदोलनासाठी आम्ही आपल्या सोबत असल्याची ग्वाही दिली. जनमत संकलित करण्यासाठी ॲड. संभाजी चुनखडे, नारायण चोरमारे, पुंजाराम खर्जुले, युवराज सोनटक्के, नशमुद्दिन शेख, गोटू उगले , बाबासाहेब चुनखडे, दिगंबर हाडे, ज्ञानेश्वर मुळे, लक्ष्मण पट्टे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
Leave a Reply