ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जबाबदार पालकत्व आणि सुसंवाद

April 1, 202214:34 PM 77 0 0

संतांची व थोर पुरुषांची भूमी म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्राची आजची स्थिती पाहिली तर भविष्याविषयी आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात त्याचे कारण म्हणजे राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण संस्थेच्या अहवालातील समोर आलेले विविध राज्यांच्या गुन्हेगारीचे आकडे. यातील विशेष म्हणजे देशात बालगुन्हेगारीचे 1 लाख 28 हजार 531 गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यापैकी 14 हजार 371 गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्रातील आहे. देशात बाल गुन्हेगारीत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे. हे सर्व पाहिल्यावर प्रश्न पडतो की ज्या वयात हातात वही, पुस्तके व पेन असायला हवा त्या वयात त्यांच्या हातून अशा कृती का व्हाव्यात? ज्या वयात मित्रमैत्रिणींशी खेळायचे, भांडायचे व पुन्हा एक व्हायचे ही मानसिकता हवी त्या वयात एवढा टोकाचा राग, दुश्मनी कशी निर्माण होते? शुल्लक कारणांवरून झालेल्या वादाचे रुपांतर शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्यात होते. सध्याची मुले घडत आहे की बिघडत आहेत? त्यांच्या तोंडी शिव्या का येतात? ती गुन्हेगारीकडे जाण्यास प्रवृत्त का होतात? याचा आज पालकांनी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. मुलांना घडविणे, शिकविणेआणि त्यांच्यावर संस्कार करणे यात पालकांचाच प्रमुख वाटा असतो. त्यामुळे मुलांच्या कर्तुत्वाचे किंवा कुकृत्याचे श्रेय अथवा दोष पालकांचाच असतो. देशाची भावी पिढी असणाऱ्या या मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पालक व त्यांचा सुसंवाद आवश्यक आहे. आज संवादच होत नाही. सध्या आई-वडील दोघेही नोकरीला असल्यामुळे मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही, त्यात मुले तासंतास मोबाईल बघत असतात ज्या वयात पूर्वीच्या काळी लहान मुलांच्या तोंडी श्लोक आणि पाढे असायचे आज त्या वयात मुले चित्रपटातील गाणी म्हणत असतात. या आमच्या भावी पिढीला आकार देण्यासाठी गरज आहे ती सुसंवादाची. सुसंस्कार, सुसंवाद आणि सुनियोजन या तीनही गोष्टी साध्य केल्यास आदर्श भावी पिढी नक्कीच तयार होईल देशाचे भवितव्य घडविणार्‍या या हातांना बळ देणारे हात सजग व सक्षम पालकांचेच असायला हवेत.
डॉ० पी. एस. महाजन
संभाजीनगर

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *