ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

प्रेमाचे रोपटे

February 13, 202212:44 PM 118 0 0

प्रेमानेच माणसाला समूहाने रहायला शिकवल

एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायला शिकवल

लहानात लहान
वृद्धात वृद्ध
होवून
एकमेकांच्या हृदयात प्रेम विश्वासाच घर बांधायला शिकवलं

प्रेमानेच प्रेम
शोधाय शिकवल
पशू पक्षी झाड वेली
दगडधोड्यांनाही आपल मानायला शिकवल

सृष्टीत आपलेपण भरायला शिकवल
पुष्पगंधापरी
दर्वळायला शिकवल

प्रेमच नसत तर
सृष्टीत जिवंतपण जाणवलच नसत
त्याच त्या गोष्टीत रोज नवेपण सापडलच नसत

भारती बागल
वडूज सातारा
8888071822

Categories: कविता, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *