ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

बाबा

April 13, 202215:18 PM 69 0 0

आभाळाची निळाई तू, समुद्राची शाई तू
भेगाळलेल्या भुईतल अंकूर तू, घायाळांसाठी फुंकर तू

शेतक-यांचा मेघ तू, दीनदुबळ्यांसाठीचा वज्र तू
न शमणार वादळ तू, कोटी कुळांचा उद्धारक तू

आडाणीसाठींच अक्षर तू, शिकणाऱ्यांसाठी साक्षर तू
ज्ञानाचे विद्यापीठ तू, समतेचा विचार तू

भगिनींचा अधिकार तू,कामगारांचा ठराव तू
मानवातला महामानव तू,जगाचा कायदा तू

स्वाभिमान-अभिमान तू, संविधान तू
चळवळ तू,श्वासातली दरवळ तू

बाबा तूच आमच्यासाठी सर्वासवे व्याप्त आहे
जे जे तुझ्या क्रपेने आम्हास प्राप्त आहे…

रूचिरा बेटकर, नांदेड.
9970774211

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *