ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महिला मतदार जनजागृती अभियानांतर्गत दहिवडी येथे महिलांची चालण्याची स्पर्धा संपन्न

November 29, 202115:37 PM 141 0 0

सातारा (विदया निकाळजे) माण खटाव तालुक्यातील महिला मतदारांच्या मनात मतदानाचा अधिकार आणि आपले कर्तव्य याविषयी जनजागृती व्हावी यासाठी प्रांताधिकारी श्री शैलेश सूर्यवंशी साहेब ,माण तालुका तहसिलदार श्री सुर्यकांत येवले आणि हरित वसुंधरा यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांची चालण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.रविवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२१ रोजी सदर स्पर्धा संपन्न झाली. मतदार नोंदणीविषयी जनजागृती व मतदानाचे गांभीर्य ,पर्यावरण संरक्षण व संवर्धन ,महिलांचे आरोग्य याविषयी यावेळी जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रजापिता ब्रह्मकुमारी च्या रूपा बहनजी यांनी पर्यावरण संरक्षण व मानसिक आरोग्याच्या विषयी मार्गदर्शन केले.

हरित वसुंधरा टीमचे अध्यक्ष डॉ.श्री.प्रदीपकुमार पालवे यांनी मतदानाचा हक्क ,मतदार नोंदणीचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले.वातावरणातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन केले पाहिजे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर कटाक्षाने टाळावा आणि सेंद्रिय भाजीपाल्याचे सेवन करावे असे सांगितले.तसेच आपले शरीर पंचमहाभूतांचे बनले असून त्याची काळजी घेतली पाहिजे असेही सांगितले.
“मतदानाचा अधिकार हा आपणास घटनेने दिलेला मुलभूत अधिकार असून आपण हा अधिकार बजावला पाहिजे, असे आवाहन अष्टभुजा हिरकणीच्या कार्यकारी संपादक विदया निकाळजे यांनी केले.
यावेळी घेण्यात आलेल्या ३ किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत दहिवडी पोलिस स्टेशनच्या महिला पोलिस सौ नेहा अजिनाथ गलांडे यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविले.द्वितीय क्रमांकाचे बक्षीस महिला पोलिस सौजन्या योगेश बागल यांनी पटकावले.तसेच तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस सौ प्रणाली म्हेत्रस यांनी मिळविला. स्पर्धेत सुमारे चौदा बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
सदर स्पर्धा हरित वसुंधरा वाकिंग पार्क येथे संपन्न झाली.सदर स्पर्धेसाठी देण्यात येणाऱ्या बक्षिसांची व्यवस्था करणाऱ्या श्री पवार ,श्री अमोल पोळ,मुन्शी सय्यद ,श्री काटकर यांनी बक्षिसांचे संयोजन केले.चैतन्य करिअर अकॅडेमीचे श्री संदीप खाडे यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी हरित वसुंधरा टिम चे सर्व सदस्य,शहाजीराजे महाविद्यालयाचे प्राध्यापक सी.एम.जठार ,दहिवडी कॉलेज प्राध्यापक एम. आर भदाने,प्राध्यापक बी.व्ही. मोरे तसेच चैतन्य अकॅडेमिचे सर्व विद्यार्थी ,प्रांत कार्यालयाचे कर्मचारी यांनी कष्ट घेतले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *