ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

‌अँड.सिकंदर शेखः निखळलेला एक समाज मोती

June 8, 202116:10 PM 143 0 0

‘मरावे परी किर्ती रुपी उरावे’ या उक्तीप्रमाणे माणसाने आपले जीवन जगावे हे संत साहित्यातून आपण ऐकलेलं वा वाचलेले आहे आणि ते मानव जीवनात फार महत्त्वाचे आहे. मानसे जन्माला येतात. आणि मागे काहीच इतिहास न ठेवता निघून जातात. अस म्हणतात की, जगण्यासाठी आपण सर्वच आलो आहोत. पण कसं जगता यालाही महत्त्व असत. आपण जगत असताना जगासाठी काय दिले हे फार महत्त्वपूर्ण आहे. जी मानसे इतरांसाठी जगतात, ती मरुनही जीवंत असतात आणि जी माणसे स्वतः साठी जगतात ते जन्मतःच मेलेली असतात. म्हणून इतरांसाठी जगणं हेच आपल्या जीवनातील इतिहासाच्या पानावर किर्ती या नावाने सुवर्ण अक्षरात लिहले जाते.असाच एक निखळलेला समाज मोती येथे विषद करीत आहे.

https://indianfast.com/

https://indianfast.com/

अँड.सिकंदर शेख हे दौंड येथील नामवंत वकील आणि सामाजिक कार्यकर्ते. यांचे नुकतेच -हदयविकाराने दुःखद निधन झाले. त्यांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली होती. विशेष म्हणजे ते दोघेही पती पत्नी कोरोना संक्रमित होते. ते सुप्रसिद्ध कवयित्री अनिसा शेख यांचे पती होते.
कवयित्री अनिसा शेख ह्यांचे सप्तरंगी साहित्य मंडळाच्या विविध साहित्य कार्यक्रमात भरीव योगदान असते. त्यांच्या पतीची नुकतीच दुःखद बातमी त्यांच्याकडून कळाली.आणि ह्या बातमीने साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली. सध्याच्या स्थितीत सारे जग दुःखमय वातावरणात आहे. ह्याच काळामध्ये सुंदर आणि जवळची मानसे आपणास सोडून जात आहेत.त्यांपैकी च अँड. सिकंदर शेख होत.तशी समक्ष त्यांची भेट घेवू शकलो नाही. पण त्यांचे कार्य या लेखातून आपल्या पर्यंत पोहोचविण्याचा एक छोटासा प्रयत्न..

शेख कुटूंब हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोळनेर या गावचे. पण अँड.सिकंदर शेख यांचे वडील रेल्वेमध्ये नोकरीस असल्याने ते दौंड येथेच स्थायिक झाले.
ते दौंड येथील न्यायालयात नावाजलेले प्रख्यात वकील होते. तसेच त्यांनी बारामती, पुणे येथे न्यायालयात वकिली केली. पण पुढे दौंड येथेच फौजदारी खटले लढवून एक वैशिष्ट्ये पूर्ण कारकीर्द बनविली होती. आणि ते भारत सरकारची नोटरीचा अधिकार प्राप्त होते. ते पंचक्रोशीतील गोरगरीबांच्या अडीअडचणी जाणून घ्यायचे. आणि त्यांच्या समस्या दुर करायचे. ते गरजुंना मदत करायचे. म्हणून जनमानसात त्यांचा फार मोठा प्रभाव होता. आपल्या गोड वाणीने आणि प्रभावी व्यक्तीमत्वाने ते प्रत्येकाला आपलेसे करायचे. एवढेच नाही तर कोणत्याही सामाजिक कार्यामध्ये ते हिरीरीने सहभागी व्हायचे. त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात जवळजवळ सत्तावीस वर्षे कार्य केले. म्हणून ते फक्त वकीलच नाही तर एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून लोकांत परीचित होते. त्यांना ब-याच कार्यक्रमात बहुमान आणि पुरस्कारीत केले होते.
शैक्षणिक, आणि सामाजिक क्षेत्रात त्यांना विशेष आवड होती. शिक्षण क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. म्हणून विविध सामाजिक लढ्यात त्यांनी पुढाकार घेवून लढे यशस्वी केले. समाज चळवळीतून विविध आंदोलनात ते सहभाग नोंदवत असत. एवढेच नाही तर ते एक चांगले रसिक होते. त्यांना कलेची आवड होती. शास्त्रीय संगीत, साहित्य क्षेत्र यामध्ये सुद्धा त्यांना खूप आवड होती.
त्यांच्या प्रोत्साहनाने आज त्यांच्या सुविद्य पत्नी कवयित्री अनिसा शेख यांनी साहित्य क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. असा सर्व क्षेत्रातील बहुमोल समाज मोती अचानक आपल्यातून निघून गेला. आणि त्यांच्या चाहत्यांना पोरकं केले.
असा माणूस पुन्हा होणे तर नाही, पण वकिली क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीच भरून निघणार नाही. पण त्यांचे कार्य आणि स्मृति ह्या पुढील काळासाठी युवकांना प्रेरणादायी ठरतील. या लेखाद्वारे सप्तरंगी साहित्य मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने अँड.सिकंदर शेख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
– बाबुराव पाईकराव, डोंगरकडा.
मो. 9665712514

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *