ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

विशेष सहाय्य योजनेंअंतर्गत १३५६ लाभार्त्यांना वर्षभरात १कोटी ,६२ लाख ७२ हजार रक्कम वाटप

April 30, 202213:52 PM 25 0 0

उरण ( संगिता पवार ) : शासनाच्या गोर -गरिबान साठी विविध योजना आहेत त्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना ,श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना गट अ,इंदिरागांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना ,इंदिरागांधी विधवा निवृत्ती वेतन योजना व राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अश्या विविध योजना आहेत . उरण तालुक्यात विशेष सहाय्य योजने अंतर्गत माहे मार्च २०२२ पर्यंत एकूण १३५६ लाभार्त्याना वर्षभरात १कोटी ,६२ लाख ७२ हजार रक्कम देण्यात आली अशी माहिती नायब तहसिलदार संदीप खोमणे यांनी दिली .
संजय गांधी निराधार अनुदान योजना एकूण लाभार्थी ७९४ ,श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना गट अ लाभार्थी ,लाभार्थी 122 , इंदिरागांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना लाभार्थी १३८ ,इंदिरागांधी विधवा निवृत्ती वेतन योजना लाभार्थी २२ ,व राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अश्या सर्व योजनेतून १३५६ लाभार्थी आहेत .
गुरुवार ( दि. २८ ) एप्रिल रोजी उरण तालक्यातील चिरनेर जवळील १ ) मीना सुनील कातकरी रा. आक्कादेवी वाडी ,२)दर्शना चंद्रकांत कातकरी रा, आक्कादेवी वाडी यांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून प्रत्येकी वीस हजार रुपये चा धनादेश ( चेक ) नायब तहसिलदार संदीप खोमणे यांच्या हस्ते देण्यात आला .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *