ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

रानसई येथील ओढ्यात अचानक पाण्याची पातळी वाढल्याने १० जण ओढ्यात अडकले : सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश

September 23, 202115:12 PM 31 0 0

तृप्ती भोईर
उरण (रायगड) : बुधवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी उरण तालुक्यातील रानसई येथील ओढ्यावर धोंड्याची वाडी व बंगल्याची वाडी येथील काही महिला व त्यांची लहान मुले अशी एकूण १० लोकं कपडे धुण्यासाठी गेले होते. ओढ्यात पाण्याची पातळी नेहमीसारखीच असल्याने बिनधास्त पणे त्यांचे काम ते करत होते, परंतु अचानक वाडीच्या वरुन डोंगरातून पाण्याचा लोंढा आला. आणि ते सर्वजण त्या पाण्यात अडकले. 

 

ग्रामस्थांच्या ही गोष्ट लक्षात आल्याने ते घटनास्थळी येऊन त्यांनी या सर्वांना बाहेर काढले, पण यातीलच एक महिला या ओढ्यात वाहत जात असतानाच सुदैवाने तीला एका दगडाचा आधार मिळाला व तीथे ती थोडीशी स्थिरावली. मग ग्रामस्थांनी तीला दोराचा आधार देऊन बाहेर काढली. या झटापटीत काही महिलांना किरकोळ जखमाही झाल्या. पण दैव बलवत्तर म्हणून हे सर्व १० जण बचावले.
रानसई येथील शाम लोंढे, सुनील भगत, गोमा लोंढे, परशुराम भोईर, हसुराम भस्मा, दिपक लोंढे व अजित भल्ला आणि सोबत इतर जागृक नागरिक यांनी घेतलेल्या परिश्रमाने व त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या १० जणांचा प्राण वाचला. पण तरीही हा पाण्याचा लोंढा अचानक कुठुन आला ? या प्रश्नाचे उत्तर असे देण्यात येत आहे की, येथील डोंगराळ भागात ही ढगफुटीच झाली असावी अन हा पाण्याचा प्रवाह ओढ्याला जाऊन मिळाल्याने ओढ्याची पातळी अचानक वाढली असे बोलले जात आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *