ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींची मदत संकटकाळात शेतकऱ्यांना राज्य शासनाचा आधार ः आ. कैलास गोरंट्याल

October 14, 202118:58 PM 52 0 0

जालना (प्रतिनिधी) ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थीक मदत करण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आज सुमारे 10 हजार कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. केंद्र शासनाच्या मदतीची वाट न पाहता राज्य शासनाने ऐन संकट काळात व सणासुदीच्या तोंडावर मदत जाहीर करून राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष आ. कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केली आहे.


जालना जिल्ह्यासह संपुर्ण राज्यात मागील सप्टेंबर महिण्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेली पीक पुर्णपणे उध्दवस्त झाल्यामुळे शेतकरी बांधवांमधून मोठी चिंता व्यक्त केली जात होती. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा खास करून मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना बसल्याचे राज्यशासनाकडे प्राप्त झालेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. अतिवृष्टी झाल्यानंतर आपण स्वतः जालना विधानसभा मतदार संघातील अनेक गावांना भेटी देवून शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची पहाणी केली. या पहाणीत झालेल्या नुकसानीची वास्तविकता आपल्या निदर्शनास आल्यानंतर जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली होती. शिवाय राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मुंबई येथे भेटी घेवून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची व्यथा आपण त्यांच्यासमोर मांडली होती. राज्यशासनाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी आज सुमारे दहा हजार कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. ही मदत जाहीर करून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अन्य विभागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संकटकाळात मदत जाहीर करून ऐन सणासुदीच्या काळात मोठा आधार दिल्याबद्दल आ. कैलास गोरंट्याल यांनी राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांचे विशेष आभार व्यक्त केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *