ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सातारा जिल्ह्यातील ओंकार भुजबळ राज्यात ११ वा

January 8, 202216:11 PM 53 0 0

सातारा हिरकणी (विदया निकाळजे) : महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज दहिवडी ता.माण या शाळेचा विद्यार्थी ओंकार आनंदराव भुजबळ याने इ.५ वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे.

ओंकार भुजबळ याने सदर परीक्षेत ३००पैकी २७२ गुण मिळवून राज्यात ११ वा क्रमांक मिळविला असून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ऑगस्ट २०२१ मध्ये घेतलेल्या परीक्षेत शहरी विभागातून त्याने हे उज्वल यश संपादन केले आहे.माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष व आदर्श शिक्षक आनंदराव भुजबळ यांचा ओंकार चिरंजीव आहे. या यशाबद्दल ओंकार भुजबळ याचे संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील, विद्यालयाचे प्राचार्य बबन खाडे ,पर्यवेक्षक अस्लम शेख, चौधरी बी.डी.,शिंदे एच.बी.,गटशिक्षणाधिकारी भरत चौगले,केंद्रप्रमुख नारायण आवळे तसेच शिक्षक बँकेचे उपाध्यक्ष श्री महेंद्र अवघडे ,शिक्षक संघाचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *