ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नामुळे चांदस वाठोडा प्रकल्पाकरीता १३६.२३ कोटींचा निधी मंजूर; अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नांना यश !

January 4, 202113:40 PM 105 0 0

वरुड  (प्रतिनिधी) मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार, माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे अध्यक्षतेखाली मोर्शी विधानसभा मतदार संघातील मोर्शी व वरुड तालुक्यातील अपुर्ण सिंचन प्रकल्प पुर्णत्वास नेणे, बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहचवून सिंचनाची सोय उपलब्ध करणे, संत्रा पिकाची लागवड मोठया प्रमाणावर असल्यामुळे सिंचन प्रकल्पावर बंदिस्त नलिका वितरण प्रणालीची कामे व सिंचन क्षेत्रात मोठया प्रमाणात वाढ करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन वरुड तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी चांदस वाठोडा ( दाभी प्रकल्प) प्रकल्पाच्या प्रस्तावित कामे व १३६.२३ कोटीच्या निधीला विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाकडून मान्यता मिळाली असून त्यामुळे प्रलंबित कामे पूर्णत्वास जातील. वरुड मोर्शी तालुक्यातील अपूर्ण प्रकल्पांची कामेही गतीने पूर्ण होतील, असे प्रतिपादन मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी केले.

वरुड मोर्शी तालुका ड्राय झोन मध्ये असून तेथे मोठ्या प्रमाणात सिंचन प्रकल्प असून मागील १० वर्षांपासून दुर्लक्षित राहिल्यामुळे सिंचन प्रकल्पांचे काम रखडलेले असून ते सर्व सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेऊन मोर्शी वरुड तालुका ड्राय झोन मुक्त करण्यासाठी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी कंबर कसली आहे .
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर अंतर्गत चांदस वाठोडा ल.पा. प्रकल्प (दाभी प्रकल्प) ता. वरुड जि.अमरावती,प्रकल्पाच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता किंमत रु. १३६.२३ कोटी किंमतीच्या प्रस्तावास नियामक मंडळाची मान्यता देण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी शासनाकडे केली होती. आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन शासनाने “ विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर अंतर्गत चांदस वाठोडा ल.पा. प्रकल्पाला महाराष्ट्र राज्य यांच्या सिंचन अनुशेष कार्यक्रमांतर्गत असलेल्या प्रकल्पाच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता १३६.२३ कोटी किंमतीच्या प्रस्तावास नियामक मंडळाची मान्यता देण्यात आली आहे या माध्यमातून वरुड तालुक्यातील अपुर्ण सिंचन प्रकल्प पुर्णत्वास नेणे, बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतकऱ्यांच्या बांधावर पुर्ण पाणी देवून सिंचनाची सोय उपलब्ध करणे, संत्रा पिकाची लागवड मोठया प्रमाणावर असल्यामुळे प्रकल्पावर बंदिस्त नलिका वितरण प्रणालीची कामे व सिंचन क्षेत्रात मोठया प्रमाणात वाढ करण्यासाठी
वितरण व्यवस्थेची कामे मार्गी लागणार असून यामध्यातून शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोई निर्माण होणार असल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू, महिला बाल कल्याण मंत्री यशोमतीताई ठाकूर यांचे आभार व्यक्त केले. वरुड तालुक्यातील शेतकरी आणि जनसामांन्यांचे जीवन समृद्ध व्हावे आणि वरुड तालुक्याला सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी पुढाकार घेतला असून वरुड मोर्शी तालुका समृद्ध करण्यासाठी तात्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी दूरदृष्टी ठेऊन मोर्शी वरुड तालुक्यात विविध सिंचन प्रकल्प तयार करून पाण्याची पातळी वाढल्यामुळे संत्रा बागांचे प्रणाम वाढल्यामुळे विक्रमी संत्रा उत्पादनामुळे मोर्शी वरुड तालुक्याला विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख निर्माण झाली. वरुड मोर्शी तालुका ड्राय झोन मुक्त करणे हा दृष्टिकोन लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी वरुड मोर्शी तालुक्यातील अपूर्ण असेलेले सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेऊन मोर्शी वरुड तालुका दुष्काळमुक्त करून सुजलाम सुफलाम करणार असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली .

जनतेचे प्रश्न सोडविणे हाच माझा उद्देश — आमदार देवेंद्र भुयार
लोकहिताचे काम करीत असताना मतदार संघातील सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, सिंचन प्रकल्पातून बंदिस्त पाईप लाईन द्वारे शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना १० तास वीज उपलब्ध देणे, प्रत्येक सब स्टेशन अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करणे, पांदण रस्ते खडीकरण, डांबरीकरण करून गावजोड रस्ते पूर्ण करणे हाच माझा अजेंडा असून ही सर्व कामे ५ वर्षामध्ये पूर्ण करणार असून केलेल्या कामांचे ब्यानर लावणे, ढोल ताशे वाजविणे फटाके फोडणे, प्रसिद्धी मिळविणे हा माझा स्वभाव नसून जनतेने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थकी ठरवणार असून जनतेचे प्रश्न सोडविणे हाच माझा उद्देश आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *