ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जासई हायस्कूल मध्ये आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची 140 वी पुण्यतिथी साजरी

February 19, 202214:58 PM 43 0 0

उरण (संगिता पवार ) : रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्युनिअर कॉलेज, जासई ,या विद्यालयात 17 फेब्रुवारी हा दिवस आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची 140 वी पुण्यतिथी दिवस म्हणून साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,भारतीय मजदुर संघाचे राष्ट्रीय महामंत्री श्री सुरेश पाटील हे होते.त्यांनी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील योगदान आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना सांगितले.

रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर व विद्यालयाचे प्राचार्य मा.अरुण घाग यांनी आद्यl क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या प्रतिमेचे आपल्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन केले.या प्रसंगी गुरुकुल इयत्ता 7 वी मधील कु. आरती सकट आणि श्रेयस कदम या विद्यार्थ्यांची मनोगते झाली. कार्यक्रमाचे सूत्र संचलन रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष श्री. नूरा शेख सर यांनी केले.या कार्यक्रमास शाळा सल्लागार समितीचे सदस्य मा.मधुकर पाटील हे उपस्थित होते.विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री साळुंखे आर.एस.व सर्व सेवक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभर प्रदर्शन विद्यालयाचे उप प्राचार्य श्री मोरे पी.पी.यांनी केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *