ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

माकसुवाच्या शिबिरात 160 नागरिकांचे लसीकरण ;कर्तव्य भावनेतून प्रत्येकाने लस घ्यावी: कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे

April 8, 202113:23 PM 38 0 0

जालना ( प्रतिनिधी) : कोरोना चा वाढत्या फैलावास नियंत्रीत करण्यासाठी लस हे जालीम औषध असून नागरिकांनी आरोग्याविषयी बेफिकीर न राहता प्रत्येकाने कर्तव्य भावनेतून लस घ्यावी. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाचे जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी आज येथे बोलताना केले. जालना कृषी उत्पादक व विक्रेता असोसिएशन ( माकसुवा) च्या वतीने मधुर बँक्वेट हॉल येथे आयोजित मोफत कोरोना लसीकरणास बुधवारी ( ता. ०७) प्रारंभ करण्यात आला. कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी लस घेतली. या वेळी आत्मा चे संचालक विजय माईनकर,असोसिएशनचे अध्यक्ष अतुल लढ्ढा,पुरूषोत्तम जयपुरिया, गोपाल मानधना, बालाप्रसाद भक्कड, योगेश शिंदे, गारखेडे पाटील, राहुल राका, सुशांत लढ्ढा, महेश अग्रवाल, यांची प्रमुख उपस्थिती होती.पहिल्या दिवशी एकशे साठ नागरिकांनी शिबीरात सहभाग नोंदवत लस घेतली.

बाळासाहेब शिंदे यांनी कोवीड चा वाढता प्रवाह कमी करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी लस घेणे गरजेचे असून माकसुवा असोसिएशनने सामाजिक दायित्वातुन राबवलेला उपक्रम हा आधार देणारा असल्याचे बाळासाहेब शिंदे यांनी नमूद केले.

असोसिएशनचे अध्यक्ष अतुल लढ्ढा म्हणाले, लस कधी येईल याकडे प्रत्येकाचे डोळे लागले होते. मध्यंतरी प्रादुर्भाव कमी झाल्याने लसी बाबत समज -गैरसमज निर्माण झाले. त्यामुळे अनेक जण लस घेत नाहीत .असे सांगून अँटीबॉडीज तयार करण्यासाठी लसीकरण महत्वपूर्ण असून रोगप्रतिकारक शक्तीस चालना मिळणार असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे .असे आवाहन अतुल लढ्ढा यांनी केले. आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या मास्क ,सॅनिटायझर चा वापर तसेच शारीरिक अंतराचे पालन करून असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी नागरिकांना लस घेण्यास सहकार्य केले .या वेळी राजेश दायमा, योगेश पटवारी, दीपक अग्रवाल, सुनील गंभीरे, सुनील झांझरिया, रमेश चव्हाण, यांच्या सह असोसिएशन चे पदाधिकारी, उत्पादक, विक्रेते, व नागरिकांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *