ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

फलटण- लोणंद मार्गावरभीषण अपघातात 2 जण जागीच ठार , तर १0 जण गंभीर जखमी

May 4, 202213:17 PM 26 0 0

फलटण (सई निंबाळकर)  : फलटण तालुक्यातील सुरवडी येथील फलटण- लोणंद मार्गावर जगतापवस्ती नजीक झालेल्या भीषण अपघातात 2 जण जागीच ठार झाले आहेत, तर १0 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.याबाबात घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की फलटण- लोणंद रोडवर जगताप वस्ती नजीक इंडिका कार एम.एच.१४ एफ.सी.११०४ व तवेरा गाडी क्रमांक एम.एच१४ बी.ए.५०५३ या गाडीचा समोरा समोर भीषण अपघात झाला आहे.

फलटण तालुक्यातील सुरवडी येथील फलटण-लोणंद रोडवर जगताप वस्ती येथे हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात गोट्या उर्फ सचिन भारत काळेल (वय ३०, रा. वळई, ता. माण, जि. सातारा) व शुभम केवटे (वय २८, रा. संगमनेर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) हे जागीच ठार झाले आहेत. तर दैवत शामराव काळेल, (वय ३७, रा. वळई, ता. माण जि.सातारा) हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील मल्लिकार्जुन विरलप्पा शिरगुंडे (वय ६३, रा. गुलबर्गा, देवरवस्ती, मायनगर), सौ. सुवर्णा मल्लिकार्जुन शिरगुंडे (वय ५५, रा. गुलबर्गा, देवरवस्ती, मायनगर), गंगाधर गुंडप्पा बेळंबगी, सौ.पोर्णिमा गंगाधर बेळंबगी व त्यांची मुले रचित व रचना, सौ. पुजा अरुण कुमार पाटील (वय २९ रा. नंदनवन सोसायटी, हिंजवडी, पुणे) व त्यांची दोन मुले अद्विक व प्रणम्या हे तवेरा गाडीतील लोक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर फलटण शहरातील लाईफ लाईन व निकोप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *