ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

हनुमान कोळीवाड्यातील आणखी २० घरे धोकादायक

July 27, 202212:09 PM 22 0 0

उरण ( संगिता पवार ) : ३३ वर्षांपासून फेर पुनर्वसनाची प्रतीक्षा : दुर्घटनेची भीती उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा चे मागील ३३ वर्षापासून फेर पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या वाळी हनुमान कोळीवाडा गावातील आणखी १५-२० घरे अतिवृष्टीमुळे अत्यंत धोकादायक बनली आहेत. जेएनपीए, सिडको, जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही धोकादायक घरे केव्हाही कोसळून दुर्घटना घडण्याची भीती रहिवाशांसह ग्रामपंचायतीने व्यक्त केली आहे.
जेएनपीए बंदरासाठी विस्थापित करून वसविलेल्या हनुमान कोळीवाडा गावालाच वाळवीने पोखरले आहे. चिखल आणि वाळवीग्रस्त मातीच्या जागेत भराव करून उभारलेल्या या गावातील १०५ कुटुंबासाठी १७ हेक्टर जागा पुनर्वसनासाठी आवश्यक होती. त्यासाठी जेएनपीएने जागा आरक्षितही ठेवली होती.
मात्र, पुनर्वसन करताना फक्त दोन हेक्टर जागेतच ते केले यामुळे अयोग्यरित्या पुनवर्सन केलेल्या हनुमान कोळीवाडयाची जेएनपीए बंदरासाठी संपादित केलेली जमीन परत करावी, अथवा अन्य ठिकाणी पुनश्च पुनर्वसन करावे, या मागणीसाठी मागील ३३ वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. परंतु याबाबत केंद्र आणि राज्य शासनाने आश्वासनांची गाजरे दाखवून
धूळफेक केली आहे.

यामुळे जेएनपीएच्या विरोधात ग्रामस्थानी भरसमुद्रात मालवाहू जहाजे रोखून आंदोलन केले होते. त्यानंतर हनुमान कोळीवाडा गावातील धोकादायक घरे पुनर्वसनासाठी होणारा अक्षम्य विलंब ग्रामस्थांच्या मुळावर येऊन उपला आहे. आधीच वाळवीने पोखरलेल्या वारवार दुरुस्त केलेल्या धोकादायक घरात अनेक कुटुंबे जीव मुठीत घेऊन राहात आहेत. घरातील जमिनीच्या खालून पाणी येत आहे. त्यामुळे पाण्यातच घरे असल्याची कायम स्थिती असते. यदा जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १५-२० घरे अत्यंत धोकादायक बनली आहेत. ती कोसळून विति होण्याची भीती आहे. यामुळे फेरपुनर्वसनाचा निर्णय न घेतल्यास पुन्हा समुद्रात जहाजे रोखण्यासाठी आंदोलन छेडावे लागेल.
• परमानंद कोळी, सरपंच, ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा
फेर पुनर्वसनाचा प्रश्न शक्य तितक्या लवकर निकाली काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. आधी निर्णय घेण्यासाठी बंदराकडे मर्यादा होत्या. त्यामुळे काही निर्णय केंद्रीय मंत्रालयाच्या मंजुरीनेच घ्यावे लागत होते. त्यामुळे विलंब होत होता. मात्र, आता प्राधिकरणाच्या स्थापनेने निर्णय क्षमतेत वाढ झाली आहे. त्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यात येणार आहे. घराच्या छपराची दुरवस्था झाली असून काही जेएनपीए प्रशासन ठिकाणी गळतीची समस्या आहे. जेएनपीए, जिल्हा पोलीस प्रशासनाची झोप उडाली. यामुळे हनुमान कोळीवाडयाच्या फेरपुनर्वसनासाठी १० हेक्टर जमीन देऊन कोट्यवधीचा सिडकोने आठ महिन्यांपासून तांत्रिक लागत आहे.
निधीही मंजूर करून विकास कारण पुढे करून मंजुरीसाठी दिरंगाई आराखडाही तयार केला मात्र या केली आहे. त्यामुळे येथील आराखड्याला जिल्हा प्रशासन, रहिवाशांना जीव मुठीत घेऊन राहावे

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *