ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

मला भावलेले शिक्षक

आपल्या सर्वांच्या आयुष्यात आपल्या गुरूंचे, शिक्षकांचे महत्त्वाचे स्थान असते. आपल्या बालवयातील संस्कारक्षम मनाला पुढे जाऊन योग्य दिशा देण्याचे काम शिक्षक करत असतात आणि यातूनच आपली जडणघडण होत असते. माझ्या आयुष्यात ही, मला खूप चांगल्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. त्यापैकी खास करून लक्षात राहिलेले शिक्षक म्हणजे, आमचे गणिताचे सर, ‘ श्री चव्हाण सर’. साधारण सरांचे वय तेव्हा […]

September 4, 202113:23 PM 23 0 3

माझे प्रेरणास्थान

मातीचा गोळा असणाऱ्या आपल्या मुलावर संस्कार करणारी माता ही प्रथम गुरु,शिक्षक असली तरी आपले जीवन जगण्यालायक करण्यासाठी आयुष्यात एखादे प्रेरणास्थान असावे लागते. माझ्या आयुष्यात मला असे एक प्रेरणास्थान मिळाले ज्यांचे आजही वेळोवेळी मला मार्गदर्शन होते.साधारणपणे एकोणासशे चौसष्ट सालापासून आज अखेर हा प्रेरणास्त्रोत वेळोवेळी माझी मरगळ काढून मला ताजेतवाने करत असतो. हा प्रेरणास्त्रोत म्हणजे शाळेत मला […]

September 4, 202113:21 PM 24 0 0

बहुरूपी

एक नाही दोन नाही अभिमान मला संपूर्ण शिक्षक वर्गाचा भावतो मनाला ध्यास त्यांचा प्रत्येक विद्यार्थी घडविण्याचा कोरोना काळात हाच शिक्षक कंपाउंडर, पोलीस पासून ते रेशनिंग वाटणाऱ्या पर्यंत रुप बदलनारा बहुरूपी झाला विद्यार्थी वाचवता वाचवता समाजही वाचवताना कित्येकांचा बळी गेला तरीही त्याने त्याचा बाऊ नाही केला कुटुंबाचा विचार न करता स्वीकार केला रोज नव्या ड्युटीचा कोरोनाचा […]

September 4, 202113:19 PM 25 0 1

माझे प्रेरणास्थान -माझी आई

नम्रतेने जे लाभेल ते बळाने कधीच मिळणार नाही.बंजर जमिनीला उगविणाऱ्या गवताला सुध्दा फाटे फुटतात, तशी आपल्या आईची प्रतिमा उजवल माथेने चमकत असते. तसे मी माझ्या आईवडिलांपोटी जन्माला आले .आयुष्यच्या वळणावर कोणतरी आपल्या जीवनाचा शिल्पकार, मूर्तिकार आणि दैवत्व असते.त्याशिवाय आपले जीवन परिपूर्ण होऊ शकत नाही “जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे निराधार आभाळाचा तोचि भाळ […]

September 4, 202113:15 PM 38 0 6

बहिणीचा वाढदिवस साजरा करायला गेलेल्या तरुणीचा धरणात बुडून मृत्यू

लोणावळा येथे बहिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या तरुणीचा लोणावळ्याच्या तुंगार्लि धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ध्वनी मनीष ठक्कर असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव असून तिच्यासह चार तरुणी लोणावळ्यात आल्या होत्या. चौघींपैकी तीन बहिणी होत्या अशी माहिती लोणावळा पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा येथे ध्वनी ही तिच्या बहिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आली […]

September 4, 202113:12 PM 22 0 0

धक्कादायक : अल्पयीन बलात्कार पीडितेनं रुग्णालयाच्या शौचालयात दिला बाळाला जन्म; अर्भकाची विल्हेवाट लावल्यानं प्रकार उघडकीस

एका अल्पवयीन मुलीने रुग्णालयातील शौचालयात प्रिमॅच्युअर बाळाला जन्म दिला आणि त्या अर्भकाला फ्लश केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केरळच्या कोचीमधील एका खासगी रुग्णालयात ही घटना बुधवारी उघडकीस आली. ही अल्पवयीन मुलगी तिच्या आईसह खासगी रुग्णालयात तपासणीसाठी गेली होती. तिथल्या शौचालयात तिने बाळाला जन्म दिला आणि अर्भकाला शौचालयात फ्लश करून बाहेर येऊन गेली. बाहेर आल्यानंतर तिने […]

September 4, 202113:11 PM 31 0 0

निवृत्त नायब तहसिलदार कचरु भालेराव यांचे निधन

जालना(प्रतिनिधी)-असलेल्या रंगनाथ नगर, इंदेवाडी पाण्याची टाकी जवळ येथील रहिवाशी निवृत्त नायब तहसिलदार कचरु लहानू भालेराव यांचे दि.3 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास वृद्धपकाळाने दुखद निधन झाले. त्यांच्यावर दुपारी रामतिर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार राजेश भालेराव व लोकजन शक्तीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भालेराव यांचे ते वडील होत.

September 4, 202113:08 PM 18 0 0

लाठी हल्ला करणाऱ्या अधिकार्‍याचे निलंबन करा नसता महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन; लहुजी शक्ती सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष सचिन क्षीरसागर यांचा इशारा

जालना ( प्रतिनिधी) : मातंग समाज बांधवांसह पञकारांवर अमानुष लाठीहल्ला करणाऱे नांदेड जिल्ह्यातील डि. वाय. एस. पी. कांबळे यांना तात्काळ निलंबित करावे नसता महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा लहुजी शक्ती सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष सचिन क्षीरसागर यांनी दिला आहे. या संदर्भात शुक्रवारी ( ता. 03) सचिन क्षीरसागर व मराठवाडा अध्यक्ष डॉ. दिलीप अर्जुने […]

September 4, 202113:06 PM 19 0 0

शिवसेनेचे गटनेते व उरण नगरपषदेचे माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांना मातृशोक

उरण (रायगड) तृप्ती भोईर : शिवसेना गटनेते व उरण नगरपषदेचे माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांच्या मातोश्री मालतीबाई भास्कर शिंदे यांचे दिनांक १ सप्टेंबर बुधवार रोजी त्यांच्या रहात्या घरी म्हणजे गणेश नगर, करंजा रोड, उरण येथे वयाच्या ७८ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. स्वर्गीय मालतीबाई शिंदे हे एक दानशूर व्यक्तीमत्व, प्रेमळ स्वभाव, तसेच आई एकवीरेच्या […]

September 4, 202112:57 PM 21 0 0

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मुंबई कार्यालयाचे शानदार उद्घाटन

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष व सत्य पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक डी. टी. आंबेगावे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, मुंबई अध्यक्ष संतोष येरम, मुंबई संपर्क प्रमुख व सत्य पोलीस टाइम्सचे उपसंपादक दिपक भोगल, दिप्ती भोगल, मुंबई महिलाध्यक्षा अंजली देवा, […]

September 4, 202112:55 PM 15 0 0