ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

सार्वजनिक गणेशोत्सव रोहा : एक गाव एक गणपती : शतकमहोत्सवी वर्ष

माझं माहेर रोहा, जिल्हा रायगड. आजवर मी रोह्यातल्या अनेक मान्यवर व्यक्तींच्या आठवणी लिहील्या असून आपण सर्वांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला आहे. नुकतीच मी गणपती सणानिमित्त रोह्याला जाऊन आले, तेव्हा समजलं की रोह्याच्या सार्वजनिक गणपती उत्सवाचं हे शतकमहोत्सवी वर्ष आहे, त्यानित्यानेच आज माझ्या मनात असलेल्या या ” एक गाव एक गणपती ” या आगळावेगळ्या बिरुदासह साजऱ्या […]

September 15, 202114:03 PM 23 0 0

अंधार मुक्त तांड्यासाठी मुक्ती संग्राम दिनापासून साखळी उपोषण : गोर सेना तालुकाध्यक्ष संदीप जाधव

जालना/ मंठा ( प्रतिनिधी) : दीड वर्षापासून वाघोडा तांडा अंधारात असून महावितरणकडे तक्रारी केल्यानंतरही तांड्यात वीज उपलब्ध होत नसल्याने येत्या दोन दिवसात वीज पुरवठा सुरळीत न केल्यास मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा गोर सेनेचे तालुकाध्यक्ष संदीप जाधव यांनी दिला आहे. या संदर्भात मंगळवारी ( ता. 14) संदीप जाधव यांच्या नेतृत्वाखाली […]

September 15, 202114:00 PM 17 0 0

दिल्लीत जेरबंद केलेला दहशतवादी धारावीतील; गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

मुंबई: दिल्लीत काल पकडण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी धारावातील असल्याचं आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दहशतवाद्यांचा मुंबईची लोकल उडवण्याचा प्लॅन असल्याचं उघड झाल्याने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. वळसे-पाटील यांनी तातडीने पोलिसांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला एटीएसचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. तर दुसरीकडे रेल्वेनेही उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. […]

September 15, 202113:58 PM 13 0 0

बदनापूर मध्ये १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

जालना : बदनापूर तालुक्यातील देवगावात माणुसकीच्या नात्याला कालिमा फासणारी दुर्दवी घटना घडली आहे. एका नराधमाणे घरासमोर कोंबड्याना दाणे टाकत असलेल्या 12 वर्षीय मुलीला घरात फरफडत घेऊन जात. तिच्यावर विवस्त्र होऊन लेंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारी वरून बदनापूर पोलिस ठाण्यात बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत […]

September 15, 202113:45 PM 16 0 0

भाईश्री फाउंडेशन जालना चा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न गरजु, होतकर विद्यार्थांचा शिक्षणासाठी भाईश्री फांऊडेशन मदत करणार – रमेश भाई पटेल

जालना-प्रतिनिधी : शिक्षकांचे कार्य निश्चीतच उल्लेखनिय असून चांगला समाज, राफ व आदर्श व्यक्तीमहत्व घडवण्याची ताकद रमेश भाई पटेल यांनी केले. शिक्षक दिनांचे औचित्य साधुन भाईश्री फांऊडेशन जालना च्या वतीने, गटशिक्षणाधिकारी, विस्तारधिकरी केंद्रप्रमुख, गटसमन्वय, शिक्षक असा एकूण 38 जणांचा कोविड – 19 व ऑनलाईन शिक्षण यामध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्या आपले सक्रीय योगदान देणाऱ्या अधिकारी व शिक्षकाचा […]

September 15, 202113:42 PM 19 0 0

गणेश मंडळांनी रक्तदान शिबिरे घ्यावीत : पो. नि. अनिरुद्ध नांदेडकर

जालना ( प्रतिनिधी) : रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाउन ने पुढाकार घेतला असून सार्वजनिक गणेश मंडळांनी रोटरी च्या सहकार्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. असे आवाहन सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी आज केले. या संदर्भात मंगळवारी ( ता. चौदा) अधिक माहिती देताना पो. नि. अनिरुद्ध नांदेडकर म्हणाले की, […]

September 15, 202113:40 PM 20 0 0

राजशासनाची खेळी ओबीसी आरक्षणाचा घेतला बळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपाचे निषेध आंदोलन-भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पाटील दानवे

जालना (प्रतिनिधी):- ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण घालविण्यासाठी राज्यशासनाची खेळी असून ओबीसी आरक्षणाचा राज्यातील महाविकास आघाडी सरकारने बळी घेतला असल्याचा घणाघाती आरोप भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा उपसभापती भास्करराव पाटील दानवे यांनी आज भाजपा जिल्हा कार्यालयात जालना येथे आयोजीत पत्रकार परिषदेत केला. यावेळी पत्रकार परिषदेत भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर, जिल्हा संघठन सरचिटणीस […]

September 15, 202113:38 PM 15 0 0

कोळे येथे वाढदिवसानिमित्त अनाथ मुलांना फळवाटप

कराड-पाटण प्रतिनिधी (सुप्रिया कांबळे) : कुंभारगाव ( ता.पाटण)येथील माजी शिक्षण सभापती संजय देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त कोळे ता.पाटण येथील जिजाऊ अनाथ आश्रम येथील मुला-मुलींना फळ वाटप करणयात आले. या आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष समीर नदाफ यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी संजीवन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक सचिन पुजारी, माजी उपसरपंच संजय भुलूगडे, सुनील धर्माधिकारी, माणिक मिस्त्री […]

September 15, 202113:36 PM 31 0 0

उल्हासनगर शाळेच्या बाल हिरकणीने बनवला इकोफ्रेंडली गणपती

सातारा(विदया निकाळजे ) सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील पळशी हद्दीतील उल्हासनगर ही जिल्हा परिषदेची शाळा विविध उपक्रम राबविण्यात प्रसिध्द आहे. शाळेतील शिक्षक सौ. अमिना इक्बाल मुलाणी व श्रीम. वैशाली दत्तात्रय खाडे दोन्ही विद्यार्थ्यांना विविध गोष्टीचे प्रशिक्षण देत असतात. याच शाळेतील अमृता दशरथ खाडे व समृद्धी दशरथ खाडे या दोन चिमुकल्या हिरकण्या,कोरोनाच्या कहरामुळे यंदाच्या वर्षी गणपती बसविण्या […]

September 15, 202113:35 PM 15 0 1

उरण येथे पाच दिवसाच्या गणपती सह गौरी देवीचे विसर्जन

उरण ( संगिता पवार ) पाच दिवसाच्या मुक्कामा नंतर मंगळवार ( दि. १४ ) रोजी गणरायाच्या सोबत गौरी मातेचे विसर्जन करण्यात आले . उरण नगरपरिषद च्या वतीने मोरा जेट्टी ,भवरा तलाव ,व उरण नगरपरिषदेचे विमला तलाव येथे गणपती व गौरी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती , विमला तलाव येथे उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे ,उपनगराध्यक्ष […]

September 15, 202113:32 PM 16 0 0