ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

अक्षरदुर्वा

बहिणाबाई तुझ्या ओठी खुलल्या मधाळ ग ओव्या देऊन काव्यविश्वास साचा स्व भाषेत गुंफण्या काव्या मन वढाय वढाय गाताना सांगे जीवनातील रंगरूप सुखदुःख डोंगर ठायीठायी तरी शब्दही पेरली अमाप शब्द तुझे सृष्टीप्रेरक असे गुणगुणतांना आनंदी नित्य सृष्टी रूपास देऊनिया दृष्टी कडू गोड अनुभवाचे सत्य सोप्या भाषेत सांगते संसार काव्यरूपात सहज रेखाटते मिळवून शब्दाचे भव्य गारुड पिढ्यानंपिढ्या […]

September 26, 202113:27 PM 20 0 0

दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून पत्नीला रॉकेल टाकून जिवंत जाळले

भिवंडी : दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून एका व्यक्तीने आपल्या पत्नीला जिवंत जाळून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना भिवंडीतील शांतिनगर परिसरात घडली आहे. कुंटूबाने तक्रार दाखल केल्यानंतर शांतिनगर पोलिसांनी शनिवारी आरोपीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरोज शेख (वय 38) आणि पत्नी रुक्साना शेख (वय 35) यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. भांडणानंतर तो पत्नीवर शारीरिक […]

September 26, 202113:24 PM 21 0 0

शासकीय शाळेत दलित मुलांसोबत भेदभाव; जेवणाची भांडी ठेवली वेगळी, तक्रारीनंतर मुख्याध्यापिकेसह स्वयंपाकी निलंबित

उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील दौदापूर शासकीय प्राथमिक शाळेतील अनुसूचित जातीतील मुलांची मध्यान्य भोजनासाठी वापरलेली भांडी वेगळी ठेवली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नवनिर्वाचित सरपंच मंजू देवी यांच्या पतीने शाळेत जातीय भेदभावाची तक्रार केली होती. या शाळेतील ८० पैकी साठ मुलं अनुसूचित जातीतील आहेत. याप्रकरणी अधिकाऱ्यांनी बेवार ब्लॉकमधील या शाळेला भेट दिली असून […]

September 26, 202113:20 PM 26 0 0

जि.प. व प.स वर भाजपाची स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी सज्ज रहावे : संतोष पाटील दानवे

जालना (प्रतिनिधी):- भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावाच्या विकासासाठी एकत्र येवून काम केल्यास विकास साध्य करता येईल यासाठी ग्रामीण तरुणांनी संघटीत होवून जि.प. व प.स. वर भाजपाची स्वळावर सत्ता स्थापन करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे यांनी जालना विधानसभा मतदार संघातील बाजीउम्रद,बाजीउम्रद तांडा, पारेगांव तांडा,मानेगांव खालसा,मानेगांव जहागिर,गणेशपुर,धांडेगांव तांडा,इंद्रानगर(साळेगांव),साळेगांव तांडा येथे […]

September 26, 202113:15 PM 14 0 0

जिल्ह्यात सिंचनक्षेत्र वाढीसाठी आवश्यक कामाबरोबरच प्रलंबित कामे पूर्ण करा – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

जालना दि.25 :- कृषी उत्पादनात भरीव वाढ होवून ग्रामीण जीवन समृध्द करणे हा सिंचनाचा मुख्य उद्देश असून जालना जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने कामाची आवश्यकता असेल त्या ठिकाणी कामे कारण्याबरोबरच प्रलंबित असलेली कामे पाठपुरावा करून पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी दिले. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा […]

September 26, 202113:11 PM 14 0 0

तरुण व महिला कामगारांनी राष्ट्रीय बेरोजगार दिवस केला साजरा

अश्विनी निलेश धोत्रे. आज लाखो युवाना बेरोजगार करणाऱ्या सरकारला जाब विचारण्याचा राष्ट्रीय बेरोजगार दिवस या निमित्ताने सर्व तरुण व महिला कामगारांनी हा दिवस साजरा केला यापुढे कोणाचाही रोजगार जाऊ नये आणि कोणाचाही संसार रस्त्यावर येऊ नये यासाठी निषेध नोंदवण्यात आला. हा निषेध मोर्चा कामगार नेते, इंटक चे राष्ट्रीय सचिव महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली या निषेध […]

September 26, 202113:07 PM 15 0 0

डोंबिवलीतील सामूहिक बलात्काराच्या भयानक घटनेच्या निषेध निदर्शनांची जनवादी महिला संघटनेची हाक

डोंबिवली येथील अल्पवयीन मुलीवर 30 नराधमांनी केलेल्या सामूहिक बलात्काराचा अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेची महाराष्ट्र राज्य कमिटी तीव्र निषेध करीत आहे. जाती अंत संघर्ष समितीचे शैलेंद्र कांबळे, पी के लाली, बालन यांनी आपल्या स्थानिक कार्यकर्त्यासोबत ताबडतोब घटनास्थळी जाऊन चौकशी केली आणि पीडितेला व पोलीस स्टेशनला भेट देऊन आरोपींना ताबडतोब अटक करून कडक शिक्षा करण्याची मागणी […]

September 26, 202113:03 PM 21 0 0

जिल्हा अध्यक्ष श्री महेंद्रशेठ घरत यांच्या पायगुणाने रायगड जिल्ह्यात काँग्रेसमध्ये इंनकमीगला सुरवात

उरण (अश्विनी निलेश धोत्रे) :रायगड जिल्हा काँग्रेस ची धुरा ज्या दिवसा पासुन महेंद्रशेठ घरत यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे त्या दिवसापासुन खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनमध्ये नवंचैतन्य संचारले आहे. अनेक कार्यकर्ते हे पक्षा पासुन बाजूला झाले होते परंतु रायगड जिल्हा अध्यक्षपदी श्री. महेंद्र घरत साहेब.यांची नियुक्ती झाल्याने.लांब झालेले काँग्रेस कार्यकर्ते पुन्हा काँग्रेस पक्षात यायला […]

September 26, 202113:00 PM 17 0 0