ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

करारी रोटी कुरकुरीत टोकरी

मैत्रिणींनो करारी रोटी किंवा कुरकुरीत टोकरी भारतातील बर्‍याच रेस्टॉरंट्समध्ये स्टार्टर म्हणून दिली जाते. ही रोटी टोकरीसारखी दिसते,म्हणुन तिला टोकरी रोटी पण म्हणतात साहित्य :- १ बाऊल मैदा, २ ते ३ टिस्पून तेल, मीठ चाट मसाला, लोणी, कोथिंबीर लाल तिखट, चिली फ्लेक्स, ओराॅगनो कृती :-मैद्यात तेल व मीठ टाका. थोडे थोडे पाणी घालून मऊ पीठ मळून […]

October 11, 202116:18 PM 21 0 0

श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाला सीएसआर प्रमाणपत्र प्रदान

जालना : येथील श्री. वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाला सीएसआर प्रमाणपत्र नुकतेच प्रदान करण्यात आले आहे. या प्रमाणपत्रामुळे आता श्रावक संघाला जगभरातून गो सेवेसाठी मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.दरम्यान, जालन्यातील श्रावक संघ हा सदरचे प्रमाणपत्र मिळवणारा राज्यातील पहिला संघ आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सदरील प्रमाणपत्राआधारे गो सेवेसाठी दान देऊ इच्छिणार्‍या जगभरातील कुठल्याही […]

October 11, 202116:13 PM 10 0 0

भाईसाहेब गुरुप्रीत सिंग यांचा अमृतवेला कीर्तन दरबार, आजपासून जालन्यात प्रारंभ पहिल्याच दिवशी भाविकांची मोठी उपस्थिती

जालना : भाईसाहेब गुरुप्रीत सिंग यांच्या अमृतवेला कीर्तन दरबारास आजपासून जालन्यातील देऊळगावराजा रोडवर असलेल्या सिंधी दरबारात दररोज सकाळी ४.३० ते ७ वाजेपर्यंत त्यांची अमृतवाणी ऐकायला मिळणार आहे. अमृतवेला सत्संग ट्रस्ट आणि पुण्य सिंधी पंचायत जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून सुरु झालेला हा कीर्तन दरबार तब्बल चाळीस दिवस म्हणजे १९ नोव्हेंबर रोजी साजरी होणार्‍या गुरु नानक […]

October 11, 202116:11 PM 13 0 0

संभाजी ब्रिगेडची राजकीय विकासात्मक घौडदौड जिल्हासह राज्यात जोरात : संतोष गाजरे

10/10/2021 रोजी सकाळी 11:30 रोजी जालना शहरातील प्रभाग क्र.16 ,गूरूबच्चन चौक परीसरात संभाजी ब्रिगेडची शाखा स्थापन करन्यात आली या शाखेचे ऊद्घाटन संभाजी ब्रिगेडचे प्रदेष कोषाध्यक्ष संतोषदादा गाजरे यांच्या हस्ते करण्यात आली,याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विजय वाडेकर हे मार्गदर्शक म्हणून तर संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष संदीप वाघमारे अध्यक्षस्थानी होते,यावेळी जिल्हासचीव दत्तात्रय कपाळे,राजेश मोरे,जिल्हा संघटक प्रा.निलेश कूहीरे,गिण्यानदेव जगताप, […]

October 11, 202116:06 PM 16 0 0

महाराष्ट्रातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना काय मदत केली हे सांगा भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे यांची ठाकरे सरकारवर टीका

जालना (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील शेतकरी व सामान्य जनता संकटांमध्ये होरपळत असताना, उत्तर प्रदेशातील जनतेचे तारणहार असल्याच्या आविर्भावात मंत्रिमंडळाच्या बैठकीत शोकप्रस्ताव संमत करणे ही ठाकरे सरकारची निव्वळ ढोंगबाजी आहे. एक हजार पन्नास कोटींच्या दलालीचे पुरावे आयकर खात्याला सापडल्याने लखीमपूर प्रकरणाच्या ढालीआडून महाराष्ट्र बंद पुकारून या गंभीर प्रकरणावरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्याचे हीन राजकारण ठाकरे सरकार करत […]

October 11, 202116:04 PM 10 0 0

जालना जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसगट मदत करा आ. कैलास गोरंट्याल यांची मंत्री अशोकराव चव्हाणांकडे मागणी

जालना (प्रतिनिधी) ः मागील महिण्यात जिल्ह्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे तसेच शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसगट भरीव आर्थीक मदत करावी अशी मागणी आ. कैलास गोरंट्याल यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठनेते अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली आहे. नांदेड येथून जालनामार्गे औरंगाबादकडे जात असतांना सार्वजनिक बांधकाम […]

October 11, 202116:03 PM 12 0 0

अनाथ बालकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे : पालकमंत्री राजेश टोपे

जालना  :- कोविड19 या महामारीमध्ये एकाच कुटुंबातील दोन्ही पालकांचे निधन झाल्याने अनेक बालके अनाथ झाली आहेत. पालक गमावल्यामुळे बालकांची मानसिक व वैयक्तिक हानी भरून निघणे शक्य नसले तरी या बालकांचे संगोपन होऊन त्यांचा आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी शासन या बालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे […]

October 11, 202116:00 PM 11 0 0

सुधाकर पाटील आणि गोरख ठाकूर यांचा आवरे गावच्या अपघातग्रस्त दिव्यांगाला मायेचा आधार

अश्विनी धोत्रे. सध्या सोशल मिडीयाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असताना याद्वारे समाजाप्रती मोलाचे कार्य कसे घडवून आणता येईल हे उरण तालुक्यातील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते तथा उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील सर आणि खोपटे गावातील होतकरू युवा सामाजिक कार्यकर्ते गोरख ठाकूर यांनी दाखवून दिले आहे.काहींदिवसा पूर्वी उरण तालुक्यातील दिव्यांग बांधवानी आवरे गावातील अपघातग्रस्त दिव्यांग बांधवाला […]

October 11, 202115:56 PM 12 0 0

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थे तर्फे नारी शक्तीचा सन्मान

उरण दि 10(राघवी ममताबादे ) श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, कार्य, विचार डोळ्यासमोर ठेऊन विविध समाजपयोगी उपक्रम राबविणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नवरात्रोत्सव निमित्त एकूण 9 महिलांचा सन्मान रँकर्स अकॅडेमीचे सभागृह,कोप्रोली चौक येथे सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला होता .प्रसिद्धी पासून दूर असलेल्या परंतु समाजात उल्लेखनीय कार्य केलेल्या विविध क्षेत्रातील एकूण […]

October 11, 202115:54 PM 17 0 0

उरण नगरपरिषदेच्या स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा कार्यक्रमा अंतर्गत तलावाची स्वच्छता

उरण ( संगिता पवार ) उरण नगरपरिषदेच्या स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा कार्यक्रमा अंतर्गत उरण नगरपरिषदेचे विमला तलावाची स्वच्छता शुक्रवार ( दि. ८ ) रोजी करण्यात आली . या वेळी उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे ,उपनगराध्क्ष जयविन कोळी ,भाजपा उरण तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर , भाजपा उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह […]

October 11, 202115:52 PM 15 0 0