ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

BLOG

बुलढाणा अर्बन बँकेत दरोडा टाकून कोट्यावधी रुपयाचा मुद्देमाल लंपास करणार्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

जालना | हिरकणी टीम अंबड तालुक्यातील शहागड येथील बुलढाणा अर्बनच्या शाखेत दरोडा टाकून कोट्यावधी रुपयांचा ऐवज लांबवणार्या तीन बंदूकधारी दरोडेखोरांपैकी दोघांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह गोंदी पोलिसांच्या पथकाला अखेर यश आले आहे. या दरोड्याच्या घटनेमुळे जिल्हा पोलिस प्रशासनासह राज्यातील पोलीस दल हादरून गेले होते. काल औरंगाबाद विभागाचे आयजी मालिकार्जुन प्रसन्ना यांनी शहागड येथे […]

October 30, 202114:27 PM 7 0 0

कोरफड चे फायदे

कोरफड हे नाव आपल्या सगळयांना परिचित आहे. ही एक औषधी वनस्पती म्हणुन सुपरिचित आहे. चमत्कारीक रोपटं म्हणुनही याला ओळख आहे, बाजारात कोरफड पासुन बनलेल्या त्वचेसंबधी बरेच उत्पादनं अगदी सहज उपलब्ध आहेत. तसच केसांना देखील कोरफडीने बरेच लाभ होतात. तसं बघीतलं तर प्राचीन काळापासुन कोरफडीचा उपयोग होत असल्याचं आपल्याला दिसतं, इतकचं काय तर इजिप्त मधील लोक […]

October 30, 202114:24 PM 18 0 0

महिला पोलीसाच्या तक्रारीवरुन महिला पोलीसासह सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी- रूचिरा बेटकर)-एका महिला पोलीसावर अन्याय करणाऱ्या तिच्या सासरच्या मंडळीतील सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. यातील एक महिला हिंगोली जिल्ह्यात पोलीस आहे. नांदेड शहरातील एका पोलीस शाखेत कार्यरत असलेल्या महिला पोलीसाने दिलेल्या तक्रारीनुसार तिचे लग्न 2014 मध्ये झाले. तिच्या एका नंनंदेच्या लग्नासाठी तिच्याकडून पैसे मागण्यात आले. सोबतच एका दिराच्या विदेशातील शिक्षणासाठी 75 हजार […]

October 30, 202114:21 PM 9 0 0

आरोग्य विषयक कायद्यांची जनजागृती व्हावी : न्या. सुवर्णा केवले रोटरी मिड टाउन तर्फे जिल्हा न्यायालयात स्थूलता तपासणी शिबिर

जालना ( प्रतिनिधी) : प्रत्येक नागरिकांस सदृढ आरोग्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध होणे हा घटनात्मक अधिकार असून तसे कायदे सुध्दा आहेत. स्वयंसेवी संस्थांनी विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघाच्या मदतीने आरोग्यविषयक कायद्यांची जनजागृती करावी .अशी अपेक्षा प्रधान जिल्हा व सञ न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी आज येथे बोलतांना केली. “आझादी का अमृत महोत्सव ” अंतर्गत रोटरी क्लब […]

October 30, 202114:19 PM 12 0 0

सी. पी. अध्यापक महाविद्यालयात मिशन युवा स्वास्थ अंतर्गत कोरोना लसीकरणास विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

 शासनाच्या मिशन युवा स्वास्थ योजने अंतर्गत शहरातील रामचंद्र सांस्कृतिक क्रीडा मंडळ जालना संचलित सी. पी. अध्यापक महाविद्यालयात दिनांक २९ ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित केलेल्या एकदिवसीय कोरोना लसीकरण शिबिरास विद्यार्थ्यांचा व परिसरातील नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. लसीकरण शिबिराचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ दयानंद भक्त यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्री प्रतीक भक्त, श्री परख भक्त […]

October 30, 202114:16 PM 12 0 0

आ. गोरंट्याल यांच्या हस्ते सोमवारी पक्ष सदस्य नोंदणीचा शुभारंभ

जालना (प्रतिनिधी) : अखिल भारतीय कॉग्रेस कमिटीच्या वतीने पक्ष सदस्य नोंदणी करण्या संदर्भात प्रदेश काँग्रेसला आदेशीत करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जालना जिल्हयात दि. 1 नोव्हेंबर सोमवार रोजी पक्ष सदस्य नोंदणीचा शुभारंभ जुना जालना गांधी चमन येथे दुपारी 2 वाजता प्रदेश कॉग्रेस उपाध्यक्ष आ. कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी जालना जिल्हा […]

October 30, 202114:14 PM 8 0 0

राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयात युवा स्वास्थ मिशन अंतर्गत लसिकरण शिबिर संपन्न

जालना (प्रतिनिधी) : राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय जालना येथे मिशन युवा स्वास्थ अंतर्गत कोविड-19 लसिकरणाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नारायणराव मुंढे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा तिड़के यांची प्रमुख उपस्थिती होती. लसिकरण शिबिराला जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने पुजा गेडाम, सुनिल घनसावंत, डॉ. शिवाजी आसाबे, अर्चना घोटकर, ज्योती कुलकर्णी, भाले आदींची उपस्थिती […]

October 30, 202114:12 PM 7 0 0

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा तात्काळ लाभ द्या : आ. गोरंट्याल

जालना (प्रतिनिधी) ः अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीतून जालना विधानसभा मतदार संघातील पात्र शेतकऱ्यांना तातडीने आर्थीक मदत करण्यात यावी अशी सुचना आ. कैलास गोरंट्याल यांनी येथे बोलतांना केली. जालना तहसील कार्यालयात आज शुक्रवारी तहसीलदारांच्या आयोजीत करण्यात आलेल्या जालना शहर संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. […]

October 30, 202114:09 PM 8 0 0

ध्येय निश्चित करून ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल केल्यास निश्चितच यश मिळते : डॉ.शुभांगी वाघमारे

सातारा (विद्या निकाळजे ) : आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याने एक ध्येय निश्चित करून ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल केल्यास निश्चितच यश मिळेल,असे मत डॉ.शुभांगी वाघमारे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत डॉ. वाघमारे यांनी पशुधन विकास अधिकारी वर्ग एक या पदाला गवसणी घालून समस्त सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपुढे आदर्श निर्माण केल्याबद्दल […]

October 30, 202114:07 PM 11 0 1

कोविड १९ मुळे निधन पावलेल्या पालकांच्या १६ मुलांना आर्थिक मदतीचा हात

सिंधुदुर्ग,कुडाळ (अर्चना गडाळे-कदम) : कोरोनाने अनेकांच्या घरात मृत्यूने थैमान मांडलेले असताना त्याचा फटका शाळेतील मुलांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. परंतु शिक्षक समितीने आपली सामाजिक बांधिलकी जोपासत निधन झालेल्या पालकांच्या मुलांना आर्थिक मदतीचा हात देत ‘आम्ही तुमच्यासोबत आहोत’ असा दिलेला दिलासा म्हणजे एक मानसिक आधारच ठरणार आहे, असे मत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवली तालुकाध्यक्ष […]

October 30, 202114:04 PM 9 0 0