ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

खुरगावच्या रक्तदान शिबीरात २६ रक्तदात्यांचा सहभाग

July 12, 202113:32 PM 73 0 0

नांदेड – तालुक्यातील खुरगाव येथे श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात भिक्खू संघाने भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या जन्मदिनानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित केले होते. त्यात २६ रक्तदात्यांनी रक्तदान करुन शिबिर यशस्वी केले. यावेळी भिक्खू संघासह बसपाचे प्रदेश महासचिव दिगांबरराव ढोले, जिल्हाध्यक्ष मनिषभाऊ कावळे, बहुजन संघर्ष सेनेचे सुखदेव चिखलीकर, नगरसेवक संदीप सोनकांबळे, नगरसेवक सुभाष रायबोले, चंदू चौदंते, उपप्राचार्य साहेबराव इंगोले, प्रा. एस. एच. हिंगोले, उपजिल्हाधिकारी गौरव इंगोले, औद्योगिक विकास कौशल्य मुख्य कार्यकारी अधिकारी कोमलवार, विलास वाठोरे, प्रा. बापुराव वाटोडे, पत्रकार संभाजी कांबळे, धम्मसेवक गंगाधर ढवळे, निवृत्ती लोणे, ईश्वर जोंधळे, रणजीत गोणारकर, मुकुंदराव आठवले, लक्ष्मण पांडागळे आदींची उपस्थिती होती.


तालुक्यातील ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण केंद्राचे संचालक धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या जन्मदिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, ऋषीपठण मासिकाचे लोकार्पण, अष्टपुरस्कार, दान पारमिता, चिवरदान, ग्रंथदान, भोजनदान, धम्मगान आदी उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाल्यानंतर रक्तदान शिबीराचे उद्घाटन रमेशदादा सोनाळे यांच्या हस्ते झाले. या शिबिरात २६ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. याचनेनंतर भिक्खू संघाने उपासकांना त्रिसरण पंचशील दिले. त्यानंतर विविध मान्यवरांनी पंय्याबोधी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले.
रक्तदान शिबिरासाठी शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने डॉ. सुषमा पांगरकर, डॉ. सबा नौशिन, तंत्रज्ञ एस. डी. नागरगोजे, ब्रदर बालासाहेब भालेराव, परिचर लक्ष्मण येळणे यांनी परिश्रम घेतले. तर संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भंते संघरत्न, चंद्रमणी, मेत्तानंद, धम्मकिर्ती, सुदर्शन, श्रद्धानंद, संघमित्र, सुमेध, सुदत्त, सुनंद, शिलभद्र, शिलानंद, उपासक उमाजी नरवाडे, नागोराव नरवाडे, आप्पाराव नरवाडे, उमाजी नरवाडे, वामन नरवाडे, अनिता नरवाडे, सुरेखा नरवाडे, रवी नरवाडे, मधुकर नरवाडे, साहेबराव नरवाडे, कृष्णा नरवाडे, राजरत्न नरवाडे, अनिल नरवाडे, सूरज नरवाडे, संजय नरवाडे, संजय सोनकांबळे, संदिप सोनकांबळे, कपिल बिऱ्हाडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपेक्षा इंगोले, प्रा. एस. एच. हि़गोले यांनी केले तर आभार गंगाधर ढवळे यांनी मानले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *