जालना (प्रतिनिधी) ः जालना नगर परिषदेसह जिल्ह्यातील भोकरदन व परतूर अशा तीन नगर परिषद काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असून या पालिकांना राज्य शासनाने मार्च 2020 मध्ये 29 कोटी 50 लाख रुपयांच्या निधी मंजुर केलेला निधी रद्द करून सदर निधी इतरत्र वळविल्याच्या मुद्दावर आ. कैलास गोंरट्याल यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात नगर विकास खात्याच्या कारभारावर आपल्या खास शैलीत टिकेची तोफ डागली.
महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ. गोरंट्याल यांनी ऐ उजाळे अपने यादो के साथ हमे रहने दे, वर्ना किसी गली मे हमारी जिंदगी की शाम हो जाएगी असाा शेर सादर करत आ. गोरंट्याल यांनी सभागृहाचे लक्ष आपल्याकडे वेधुन घेतलेे. जालना शहरातील स्टिल कारखानदारांच्या असलेल्या अडीअडचणींसह नगर विकास खात्याच्या कारभाराकडे त्यांनी विधानसभा अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, विद्यमान आमदारांच्या पत्राला नगर विकास खात्याकडून काहीच महत्व दिले जात नाही आणि माजी आमदारांना मात्र भरीव निधी दिला जात आहे. नगर विकास खात्याचा कारभार नेमका उलटा सुरु असून या पेक्षा दुभाग्य काय असू शकते. या प्रसंगाला अनुसरुन आ. गोरंट्याल यांनी जितनी चाहा उतनी मोहब्बत नही मिली, मुनाफेको छोडो लागद भी नही मिली, कातील मेरा कत्ल करके मशहुर हो गया, और मे शहीद होकर भी मुझे शौहरत नही मिली हा शेर सादर करून शासनाकडुन निधी वितरीत करतांंना होत असलेल्या दुजाभावा बाबद आपले दुःख सभागृहात मांडले. आ. गोरंट्याल यांनी आपल्या खाज शैलीत सादर केलेल्या शेरो शायरीला सभागृहात उपस्थित असलेल्या सदस्यांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला. आ. गोरंट्याल यांनी नगर विकास खात्याने मार्गील वर्षी मार्च महिन्यात मंजुर केलेला निधी पुन्हा रद्द केल्याबद्दलचा मुद्दा सभागृहात उपस्थित करतांना सांगितले की, जालना नगर पालिकेसह भोकरदन आणि परतुर या तीन्ही नगर पालिका काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असून 26 मार्च 2020 रोजी नगर विकास खात्याने शासन निर्णय काढून वैशिष्टयपुर्ण योजने अंतर्गत 7 कोटी रस्ते अनुदान 1 कोटी आणि अन्य मिळुन सुमारे 29 कोटी 50 लाख रुपयांच्या निधी या तीन नगर पालिकांसाठी मंजुर केला होता. मात्र जिल्ह्यातील 4 पैकी उपरोक्त 3 नगर पालिका काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असल्यामुळे 31 मार्च 2020 रोजी नगर विकास खात्याने पुन्हा नविन शासन निर्णय काढत मंजुर केला 29 कोटी 50 लाखाचा निधी रद्द केल्याबद्दल संताप व्यक्त करून सदरच्या निधी वाटपाचा लेखा जोखा आ. गोरंट्याल यांनी सभागृहात सादर केला. विद्यमान आमदारांनी मागणी केल्यानंतरही निधी मिळाला नाही मात्र जालन्याचे माजी आमदार यांच्या मागणीनंतर 7 कोटी, बदनापुरच्या माजी आमदाराच्या मागणीनंतर 2 कोटी 50 लाख, जिल्हा प्रमुखांच्या मागणीनंतर 2 कोटी आणि एका साध्या नगरसेवकाच्या मागणीवरून एक कोटी इतका निधी नगर विकास खात्याकडून वितरित करण्यात आल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधून सत्तेत असलेल्या आमच्या सारख्या आमदारांचे हे दुर्भाग्य आहे. सत्ताधारी आमदारांवर ओढावलेल्या या प्रसंगावरुन आ. कैलास गोरंट्याल यांनी सभी का लहुल मिला है इस सरकार बनाने में,यह सरकार किसी एक कि जहागीर नही है असा शेर सादर करत झोपेचे सोंग घेणार्या नगर विकास खात्याला जागवण्याचे काम करावं असे साकडे विधानसभा अध्यक्ष व उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांना घातले.
Leave a Reply