ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण येथे श्री स्वामी समर्थ केंद्राचा ४ था वर्धापनदिन

June 6, 202218:22 PM 24 0 0

उरण (संगिता पवार ) : उरण आनंद नगर येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्राचा ४ था वर्धापन दिन सोमवार ( दि. ६ ) रोजी आयोजित करण्यात आला आहे . सकाळी ८ वाजता भूपाळी आरती ,८.१५ वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक ,सकाळी ९ ते १२ वाजता श्री स्वामी सारामृत हवनयुक्त पाठ सकाळी १०.३० वाजता नैवद्य आरती ,दुपारी १. ते ३ वा पर्यंत महाप्रसाद ,दुपारी ३.३० ते ६ वा .श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा होणार आहे .

पालखी आनंद नगर येथून निघुन पुढे पालवी हॉस्पिटल ,कामगार वसाहत ,कामठा ,एन आय हायस्कूल .स्वामी विवेकानंद चौक ,गणपती चौक राजपाल नाका ,पालवी हॉस्पिटल ,,आनंद नगर संस्कार केंद्र यथे सांगता समारोप होईल .सायंकाळी ६.३० वाजता वैवेद्य आरती व कार्यक्रमाची सांगता होईल .असे श्री स्वामी समर्थ सेवेकरी यांनी सांगितले .
श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्रात दररोज ८ वाजता आरती ,८.१५ वाजता अभिषेक ,व दर गुरुवारी सकाळी ८ वाजता ,१०.३० वाजता ,व सायंकाळी ६ .३० वाजता आरती घेण्यात येते.त्याच प्रमाणे नागरिकांच्या समस्या ,प्रश्न हे स्वामीच्या सेवेकरी यांच्या कडून मोलाचे मार्गदर्शन केले जाते .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *