ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने मोर्शी तालुक्यातील ६९ पांदण रस्ते मंजूर ; पांदण रस्त्यांमुळे शेतकऱ्यांची वहिवाट सुखद होणार — आमदार देवेंद्र भुयार

February 25, 202113:37 PM 81 0 0

मोर्शी प्रतिनिधी : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असणारे पांदण रस्ते त्वरीत पूर्ण करण्याच्या उद्देशाने मोर्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पांदण रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्याच अनुषंगाने आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने मोर्शी तालुक्यातील ६९ पांदण रस्त्याच्या कामांना मंजुरात मिळाली आहे. आमदार देवेंद्र भुयार यांचा शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणे हा जिव्हाळ्याचा विषय आहे. शेतकऱ्यांना शेतातील शेतमाल काढण्याकरिता व शेतात जाण्याकरिता पांदण रस्त्याची दुरावस्था पाहून शेतकऱ्यांच्या पांदण रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. यांत्रिकीकरणामुळे शेतामध्ये पेरणी, अंतरमशागत, कापणी, मळणी यासारखी कामे यंत्रांमार्फत करण्यात येतात अशा यंत्र सामग्रीचा वाहतूक करण्याकरता पावसाळ्यातही शेत पांदण रस्ते सुयोग्य असणे काळाची गरज आहे .आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी वरुड तालुक्यातील पांदण रस्ते पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. या दृष्टिकोनातून पांदन रस्ते योजना राबविण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने कामांचे नियोजन करण्यात आले आहे. मोर्शी तालुक्यात ६९ पांदण रस्त्याची कामे मंजूर करण्यात आली असून बाकी पांदण रस्त्यांची कामे त्वरीत पूर्ण केली जातील, असे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले.

मोर्शी वरुड तालुका संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून शेतातील संत्रा काढण्याकरिता मोठे वाहन शेतात नेण्याकरिता अडचणींचा सामना करावा लागतो शेतकऱ्यांना वहिवाटीकरिता पांदण रस्त्यांची मोठी अडचण आहे. हीच अडचण लक्षात घेता मोर्शी तालुक्यातील पांदण रस्ते मोकळे करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी प्रयत्न सुरू केला.
मोर्शी तालुक्यातील पालकमंत्री पांदण रस्ते योजना २०२०-२०२१ अंतर्गत कोळविहिर येथील रेल्वे पुलापासून ते विष्णोरा पांदण रास्ता, अहिल्याबाई होळकर स्कूल ते गजानन कानफाडे यांच्या शेतापर्यंत, अशोकराव तंतरपाडे यांच्या शेतापासून ते पंकज भाकरे यांचे शेतापर्यंत (० ते १ किमी), अशोकराव तंतरपाडे यांच्या शेतापासून ते पंकज भाकरे यांचे शेतापर्यंत (१ ते २किमी), जिजाबाई ठाकरे यांच्या शेतापासून ते शामराव माहूरे यांच्या शेतापर्यंत, कोळविहिर येथील स्मशानभूमी ते सचिन चरपे यांच्या शेतापर्यंत, झटाले यांच्या शेतापासून ते रेल्वे स्टेशन पर्यंत, मधुकर गतफने यांच्या शेतापासून ते प्रशांत गतफने यांच्या शेतापर्यंत असे एकूण ८ पांदण रस्ते, डोमक येथील गावापासून ते बाबासाहेब कोंडे यांच्या शेतापर्यंत, सुभाष कोंडे ते बाळासाहेब कोंडे यांच्या शेतापर्यंत, विजय नावडे यांच्या शेतापासून ते आष्टोली शिवरापर्यंत(० ते २.५० किमी), डोमक येथील गावापासून ते आष्टोली पर्यंत ( ० ते ३ किमी), असे डोमक येथील एकूण ९ पांदण रस्ते, आष्टोली येथील आष्टोली ते गणेजा नवीन पांदण रास्ता ( ० ते ३ किमी), आष्टोली ते डोमक नवीन पांदण रास्ता , आष्टोली ते तरोडा नवीन पांदण रस्ता(० ते २ किमी) बबनराव अढाऊ यांचे शेतापासून सुरेश कोंडे यांचे शेतापर्यंत(० ते २ किमी), असे आष्टोली येथील एकूण ९ पांदण रस्ते, चिंचोली गवळी येथील अरुण एकोतखाने यांच्या शेतापासून ते नळा नदीपर्यंत, चिंचोली गवळी ते अंबाडा पर्यंत पांदण रास्ता असे ऐकून २ पांदण रस्ते, ब्राम्हणवाडा येथील ब्राम्हणवाडा ते तळेगाव पांदण रस्ता (० ते २ किमी), ब्राम्हणवाडा ते रिद्धपुर पांदण रस्ता(० ते २ किमी), ब्राह्मणवाडा येथील ६ पांदण रस्ते, घोडदेव येथील हनुमान मंदिर ते सुधाकर मरकाम यांच्या शेतापर्यंत, शाहिद कुरेशी यांच्या शेतापासून ते शहा यांच्या शेतापर्यंत, सुधाकर मरकाम यांच्या शेतापासून शहा यांच्या शेतापर्यंत घोडदेव येथील ३ पांदण रस्ते, हिवरखेड येथील हिवरखेड ते हनुमान मंदिर पर्यंत, हनुमान मंदिर ते रामपूर कॅनल पर्यंत, मारोतराव काळे ते बंडू पाटील यांच्या शेतापर्यंत, बंडू पाटील ते साहेबराव होले यांच्या शेतापर्यंत, सुजित धरमकर ते नंदू तिडके यांच्या शेतापर्यंत, शरद राऊत ते किसना वैराळे यांच्या शेतापर्यंत, मोहनराव तोटे ते मदन बाडखे यांच्या शेतापर्यंत, माणिकराव सदाफळे ते नारायण आमले यांच्या शेतापर्यंत, लखन नायक ते सुभाष देवघरे यांच्या शेतापर्यंत गणेश गुडधे ते दामोदर वानखडे यांच्या शेतापर्यंत, नारायनसिंग बघेल ते पुंडलिक अमृते यांच्या शेतापर्यंत, श्रीपादराव ढोमने ते विनोद ढोरे यांच्या शेतापर्यंत, अनिल चरडे ते विजय भोजने यांच्या शेतापर्यंत, अमोल तोटे ते केशव वासनकर यांच्या शेतापर्यंत, अमोल तोटे ते विनायक गहुकर यांच्या शेतापर्यंत , मनोज मोकलकर यांच्या शेतापासून ते त्र्यंबक गिरी यांच्या शेतापर्यंत, मारोतराव भुंते ते मधुकर तडस यांची शेतापर्यंत पांदण रास्ता, हिवरखेड येथे असे एकूण १८ पांदण रस्ते, अंबाडा येथील हनुमान मंदिर ते अष्टगाव पांदण रस्ता, अंबाडा ते खानापूर पांदण रस्ता गुणवंत महाराज टेकडी ते संभावित यांच्या शेतापर्यंत, देविदास सोनारे यांच्या शेतापासून ते सायवाडा पिंपरी पांदण रस्ता, दीपक खोडस्कर यांच्या शेतापासून ते पिंपरी गावापर्यंत ,अंबाडा येथील असे एकूण ६ पांदण रस्ते, खानापूर येथील रोहणाळा रेल्वे पुलापासून ते पिंपळखुटा पांदण रस्ता ( ० ते २ किमी), २ पांदण रस्ते, येरला येथील मोहन मडघे यांच्या शेतापासून ते अमरावती रोड पर्यंत, पांदण रस्ता, डोंगर यावली येथील जेवडे ते विश्वास गुल्हाने यांच्या शेतापर्यंत पांदण रस्ता, खेड येथील तुकाराम ढाकुलकर ते रवींद्र चंदेल यांच्या शेतापर्यंत पांदण रस्ता, दुर्गवाडा येथील जी प शाळेपासून ते बाबूखा यांच्या शेतापर्यंत पांदण रस्ता, निंभी येथील संजय अकोलकर यांच्या शेतापासून पाझर तालावापर्यंत पांदण रस्ता, गणेशपुर येथील पिंपरी गावापासून ते सुभाष केंडे यांच्या शेतापर्यंत पांदण रस्ता, या ६९ पांदण रस्त्यांना प्रशासकीय मंजुरी आदेश १२ फेब्रुवारी रोजी देण्यात आला. काही दिवसात परिसरातील पांदण रस्ते मोकळे होणार असल्याने शेतकऱ्यांची वहिवाट सुखद होणार आहे. पालकमंत्री पांदण रस्ते योजनेतून मोर्शी तालुक्यातील ६९ पांदण रस्त्यांचे काम मंजूर करण्यात आले असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *