नांदेड (प्रतिनिधी) भोकर तालुक्यातील ग्रामपंचायती कडे ७ कोटी ६३ लाख रु. थकबाकी: महावितरण कंपनीने काढली ७ दिवसाची नोटीस 15 व्या वित्त आयोगातून थकबाकी भरण्याचे आदेश भोकर( तालुका प्रतिनिधी)तालुक्यातील जवळपास 66 ग्रामपंचायतींना विद्युत वितरण कंपनीने गावातील पथदिवे व पाणीपुरवठा योजनेची थकबाकी भरण्याबाबत नोटीस काढली असून तालुक्यात 7 कोटी 63 लाख रु. थकबाकी आहे 15 व्या वित्त आयोगातून सदर थकबाकीची रक्कम भरावी असा शासन निर्णय ग्रामविकास मंत्रालयाने काढल्याने सरपंच मंडळी मात्र हैराण झाली आहे.
ग्रामपंचायतींना पथ दिव्यासाठी , पाणीपुरवठा योजनेसाठी विद्युत पुरवठा महावितरण कंपनीकडून करण्यात येत होता मात्र देयके एवढ्या मोठ्या प्रमाणावर थकबाकी कधीही नोटीस काढण्यात आलेली नाही दरवर्षी काहीप्रमाणात ग्रामपंचायतीच्या उत्पन्नानुसार रक्कम भरण्यात येत होती महावितरण कंपनीने सुद्धा थकबाकी भरण्याबाबत आज पर्यंत तगादा कधीही लावलेला नव्हता त्यामुळे ग्रामपंचायतीचा विद्युत पुरवठा व पाणीपुरवठा चा विद्युत पुरवठा चाललेला होता.
महावितरण कंपनीने काढली 7 दिवसाची नोटीस
तालुक्यातील ग्रामपंचायतींना नुकताच 15 वा वित्त आयोगाचा निधी प्राप्त झालेला आहे त्यानंतर महावितरण कंपनीने ग्रामविकास मंत्रालयाच्या आदेशानुसार 15 व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीकडे असलेली पथदिव्यांची व पाणीपुरवठ्याची थकबाकी सात दिवसात भरण्यात यावी अशी नोटीस ग्रामपंचायतींना काढल्याने एकच खळबळ उडाली ग्रामपंचायतीला मिळालेल्या पंधराव्या वित्त आयोगाच्या विकास निधीचा आराखडा यापूर्वीच तयार झालेला आहे त्यामध्ये गावाच्या विकासाची कामे सुचविण्यात आलेली आहेत विद्युत बिलाची थकबाकी भरण्याबाबत काहीही उल्लेख केलेला नव्हता मात्र अचानक पणे विद्युत थकबाकी भरण्याबाबत ची नोटीस 15 व्या वित्त आयोगातून भरण्याचा आदेश काढण्यात आल्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार मात्रविकासाच्या दिशेने चालणार नाही हे स्पष्ट दिसत आहे कारण ग्रामपंचायतींना उत्पन्न मोठ्या प्रमाणावर नाही गावातील कर वसुली होत नाही त्यामुळे गावातील विकास कामे कशी करायचे हा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे.
2 लाख ते 19 लाखा पर्यंतची थकबाकी
एप्रिल 2020 ते जून 2021 पर्यंत थकबाकी असल्याच्या नोटिसा ग्रामपंचायतींना देण्यात आलेले आहेत त्यामध्ये सर्वसाधारण ग्रामपंचायत असली तरी छोटी ग्रामपंचायत असली तरी 2 लाख 3 लाख 5 लाख 10 लाख 12 लाख 14 लाख 15 लाख 19 लाखरुपये भरण्याबाबत च्या नोटिसा ग्रामपंचायतींना देण्यात आलेले आहेत त्यामुळे सर्व कारभाराचा गोंधळ उडाला असून 15 व्या वित्त आयोगातून आलेला निधी सरळ थकबाकी भरण्यासाठी वळता करण्यात येईल असेही नमूद करण्यात आल्याने ग्रामपंचायतीचे कारभारी सरपंच मात्र अडचणीत आलेले दिसत आहेत. कांडली ग्रामपंचायत 19लाख हाडोळी ग्रामपंचायत 14 लाख, बेंबर ग्रामपंचायत 12लाख अशी भरमसाठ देयके आल्याने ग्राम पंचायत हैराण झाल्या आहेत
भरमसाठ देयके कुठल्या आधारे लावली – अमृतवाड
भोकर तालुक्यातील ग्रामपंचायतींना अवाच्या सव्वा देयके लावून महावितरण कंपनीने मोठा गोंधळ निर्माण केला आहे लाखोंची देयके 2 लाख ते 19 लाखापर्यंतची दिले आहेत त्यामुळे सरपंच मंडळी हैराण झाली असून महावितरण कंपनीने कुठल्या आधारावर एवढी देयके दिली महावितरण कंपनी कडे काय पुरावा आहे एवढी वीज वापरल्याचा किती युनिट वापरले हे कशावरून ठरवले हा जाब आम्ही विचारणार आहोत ह्या प्रकरणात योग्य निवाडा नाही झाला तर आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत 15 व्या वित्त आयोगातून विज बिल देयके भरणार नाही असा ठराव अनेक सरपंच ग्रामपंचायतीने घेतलेला आहे अशी माहिती सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष माधवराव अमृतवाड यांनी अष्टभुजा हिरकणीशी बोलताना दिली आहे.
Leave a Reply