ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण मधील सोमवार पासून ७० शाळा सुरू

October 6, 202114:47 PM 11 0 0

उरण (संगिता पवार ) शासनाच्या आदेशानुसार उरण तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील ७० शाळा सोमवारी सुरू झाल्या. पहिल्या दिवशी ६१३ शिक्षक व ८,३४३ विद्यार्थ्यांनी उपस्थिती दाखवली असल्याची माहिती उरण गटशिक्षणाधिकारी के. बी. अंजने यांनी दिली.


मागील दीड – दोन वर्षांपासून प्रादुर्भाव रोखण्यासाठी उरण तालुक्यातील शाळा, महाविद्यालये बंद
करण्यात आली होती. सोमवारी उरण तालुक्यातील शहरी भागातील ८वी ते १२वीपर्यंतच्या आठपैकी सात शाळा सुरू झाल्या आहेत. या सात शाळांमध्ये १,३५० विद्यार्थी, तर १०३ शिक्षकांनी हजेरी लावली होती. ग्रामीण भागातील ५वी ते १२वीपर्यंतच्या एकूण ६७पैकी ६२ शाळांची घंटा वाजली. या ६२ शाळांमध्ये ६,९९३ विद्यार्थी आणि ५१० शिक्षक उपस्थित होते. पुन्हा एकदा शाळेत विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *