सातारा,(विदया निकाळजे) सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शाळा हिवरे ता कोरेगाव येथील क्रीडा शिक्षक श्री अमीर आतार सर यांनी १५ ऑगस्ट या दिवशी ७५ किमी सलग सायकलिंग करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला.सन २०२० या वर्षातील टोकियो ऑलांपिक स्पर्धेतील अँथलेटिक खेळाडू यांच्या सन्मानार्थ I Ride For India यांच्या वतीने घेण्यात आलेल्या व्हर्चुअल सायकलिंग स्पर्धेत श्री अमीर आतार सर यांनी सहभागी होऊन अवघ्या ३तास १७ मिनिटात त्यानी ७५ किलोमीटर हे अंतर यशस्वी पणे पार केले.
स्वातंत्र्य दिना दिवशी शाळेत ध्वजा रोहन वेळेत करता यावे या साठी त्यानी हे अंतर पहाटे मध्यरात्री ३ ते सकाळी ६.१७ पर्यंत पूर्ण करून शाळेतील ध्वजा रोहन कार्यक्रम ही वेळेत पूर्ण करून अनोखी कामगिरी केले.७५किलोमीटर हे अंतर त्यानी कोरेगाव रेल्वे स्टेशन -आझाद चौक -एस टी स्टँड – एकांबे रोड ते दरबार हॉटेल असे ९ फेऱ्या करीत पूर्ण केले त्या बद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.या दिवशी सायकलिंग सारख्या उपक्रमातून त्यानी इंधन बचाओ तसेच विद्यार्थी आणि पालक वर्गाला आरोग्याचे,व्यायामाचे महत्त्व ही पटवून दिले.७५ वा स्वातंत्र्य दिना दिवशी ७५ किलोमीटर सायकलिंग केल्याने त्यांच्या या उपक्रमा बद्दल तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी श्री धनंजय चोपडे ,विस्तार अधिकारी विशाल कुमठेकर,केंद्र प्रमुख आनंदा काकडे,मुख्याध्यापक श्री मधुकर घार्गे ,सरपंच श्री अजित खताळ, सर्व ग्रामस्थ ,सहकारी श्री शामराव वाघमोडे,जहांगीर हकीम, सागर भुंजे,संजय दिक्षीत, तालुक्यातील सर्व शिक्षक वृंद, क्रीडा समन्वयक शिक्षक समितीचे अध्यक्ष श्री नितीन शिर्के,कोरेगाव रनर फाउंडेशन चे अध्यक्ष गजानन देवकर सर्व सदस्य तसेच कोरेगाव सायकल वेडे ग्रुप चे सर्व सदस्य आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Leave a Reply