ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण येथे स्वातंत्र्य दिनाचा ७५ वा वर्धापन दिन समारंभ साजरा

August 17, 202215:10 PM 10 0 0

उरण ( संगिता पवार ) : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन सोमवार ( दि. १५ ) ऑगष्ट रोजी उरण शहरात सर्वत्र साजरा करण्यात आला. उरण नगरपरिषद कार्यालया समोर प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .त्या वेळेस तंबाखू मुक्त अशी शपथ देण्यांत आली त्याच प्रमाणे नगरपरिषद भवरा समाज मंदिर ,प्राथमिक शाळा क्र. १ व २ ,प्राथमिक शाळा मोरा येथेही प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्षा सायली म्हात्रे , प्रशासकीय अधिकारी अनिल जगधनी , नगरसेवक रवी भोईर नगरसेवक कौशिक शाह ,नगरसेवक राजेश ठाकूर ,कनिष्ठ अभियंता झुंबर माने ,आरोग्य निरीक्षक हरेश तेजी , माजी स्वतंत्रसैनिक ,संजय पवार ,उरण नगरपरिषद कर्मचारी , विजय पवार ,नगरसेविका ,नगरसेवक नागरिक आदी उपस्थित होते.
उरण तहसील कार्यालयाच्या परांगणात तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी पोलीस अधिकारी ,नायब तहसिलदार( महसूल ) नरेश पेढवी ,निवासी नायब तहसीलदार गजानन धुमाळ ,राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील ,कॉंग्रेस चे रायगड जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर ,कॉंग्रेस चे तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे , उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील ,राजिप सदस्य विजय भोईर ,सिमा घरत ,अफशा मुकरी ,स्वतंत्र सैनिक रामनाथ गायकवाड ,नागरिक आदी उपस्थित होते.
,ग्राईडवेल नॉर्टन मोरा येथे ध्वजारोहण करून अॅडमिनचे मॅनेजर आय .बी .सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली मोरा गावात रॅली काढण्यात आली . ग्राईडवेल परिवार सहभागी झाले होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *