ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

बैलगाडा शर्यतीचे आयोजन अंगलट, फलटण तालुक्यातील एकुण २० जणां विरुध्द गुन्हा दाखल

April 16, 202215:07 PM 31 0 0

फलटण शहर प्रतिनिधी सई निंबाळकर – याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दि . १५/०४/२०२२ रोजी सकाळी ०८.०० वा . पासून पवारवाडी , ता . फलटण येथील जमीन गट नं . ५७ मधील विनायक सदाशिव मोहिते यांचे शेतजमीनीमध्ये पवारवाडी गावच्या जोतिलिंग यात्रेनिमित्त नितीन जगन्नाथ वरे व त्यांच्या इतर सहका – यांनी बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले होते .
त्याठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक मा . सोनवणे सोो , स . पो . फौ . सूर्यवंशी , पो.हवा.शेळके ब.नं .१४७५ , पो.कॉ.अवघडे ब . नं . २५०१ , होमगार्ड धिरज राजेंद्र भोसले सनद क्रमांक ८१० ९ , आकाश राजकुमार सावंत सनद क्रमांक ७ ९९ ३ व आकाश राजाराम घाडगे सनद क्रमांक ८० ९ ० असे बंदोबस्ता करीता सदर ठिकाणी सकाळी ०८.०० वा . पासून कर्तव्यावर हजर होते . सदर बैलगाडा शर्यतीच्या आयोजकांनी प्रशासनाकडुन रितसर परवानगी घेतल्यामुळे फलटणच्या नायब तहसिलदार श्रीमती दिपाली संपतराव बोबडे मॅडम , आसूचे मंडलाधिकारी श्री . कोकरे व चालक भिसे हे देखिल बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी उपस्थित होते . बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी आलेल्या लोकांपैकी एक इसम त्याचे नातेवाईकांची बैलगाडी शर्यतीमध्ये उतरविण्यासाठी सदर बैलगाडा शर्यतीचे आयोजक नितीन जगन्नाथ वरे रा . पवारवाडी , ता . फलटण यांना आग्रह धरत होता . त्यास नितीन जगन्नाथ वरे यांनी नकार देताच त्या दोघांमध्ये शाब्दीक वादावादी सुरु झाली .त्यांचा वाद पाहुन बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आलेले व बैलगाडा शर्यतीचे आयोजक असे दोन्ही बाजूचे लोक त्या भांडणामध्ये पडुन आरडाओरडा करीत एकमेकांना धक्काबुक्की करून करुन सार्वजनिक शांतता बिघडवत असताना योग्य वेळी अक्षय सोनवणे सहा . पोलीस निरीक्षक व पोलीस स्टाप यांनी परिस्थिती नियंत्रणात आणुन आरोपी नामे १ ) नितीन जगन्ना वरे २ ) सुहास आनंदराव पवार ३ ) विकास ज्ञानदेव वरे ४ ) चंद्रकांत दत्तात्रय पवार ५ ) अजित पोपटराव हजारे ६ ) राजेंद्र भानुदास पवार ७ ) सुधीर मारुती पवार ८ ) राहुल जगन्नाथ वरे ९ ) धनराज बाळासाहेब पवार १० ) वैभव महादेव पवार ११ ) चांगदेव वसंत व्हाण १२ ) गणेश संभाजी चव्हाण १३ ) शिवाजी रामचंद्र कदम १४ ) बाळु सोपान जगदाळे १५ ) राजेंद्र संपत चव्हाण सर्व रा . पवारवाडी , ता . फलटण अशी असल्याचे सांगितले . तसेच बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी आलेल्या लोकांनी त्यांची नावे १६ ) तानाजी मधुकर गुरव १७ ) दत्तात्रय भाऊसो गावडे १८ ) किशोर भगवान भोसले १ ९ ) बाळासाहेब नारायण यादव २० ) हनुमंत महादेव खारतोडे सर्व रा . पवारवाडी , ता . फलटण जि . सातारा यांना ताब्यात घेवुन सदर आरोपी विरुध्द फलटण ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. २८ ९ / २०२२ भादविस कलम १६० प्रमाणे गुन्हा दाखल करून सर्व आरोपीस ताब्यात घेवुन आरोपी सी.आर.पी.सी. ४१ अ ( १ ) प्रमाणे नोटीस देवुन सोडण्यात आलेले आहे . सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक मा . धन्यकुमार गोडसे सोो . यांचे मार्गदर्शनाखाली एस.एस.सुर्यवंशी सहा . पोलीस फौजदार हे करीत आहेत .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *