नांदेड (प्रतिनिधी- रूचिरा बेटकर)-एका महिला पोलीसावर अन्याय करणाऱ्या तिच्या सासरच्या मंडळीतील सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. यातील एक महिला हिंगोली जिल्ह्यात पोलीस आहे. नांदेड शहरातील एका पोलीस शाखेत कार्यरत असलेल्या महिला पोलीसाने दिलेल्या तक्रारीनुसार तिचे लग्न 2014 मध्ये झाले. तिच्या एका नंनंदेच्या लग्नासाठी तिच्याकडून पैसे मागण्यात आले.
सोबतच एका दिराच्या विदेशातील शिक्षणासाठी 75 हजार रुपये आणि घरगुती वस्तू साहित्य खरेदी करण्यासाठी 47 हजार रुपये देण्यासाठी तगादा लावण्यात आला. सासरच्या मंडळीची अपेक्षा पुर्ण केली नाही म्हणून महिला पोलीसाला जाणून बुजून शिवीगाळ करणे, छोट्या-छोट्या कारणांसाठी तिला बोलणे, उपाशी ठेवणे, थापड बुक्यांनी मारहाण करून मानसिक व शारिरीक छळ करणे आणि जिवे मारण्याची धमकी दिली असे अनेक प्रकार केले. भाग्यनगर पोलीसांनी महिला पोलीसाच्या तक्रारीवरुन तिचा नवरा विशाल, सासरा गोपीनाथ, सासू राजश्री, दीर दिपक आणि दोन नंणंदा ज्यामध्ये एक नणंद हिंगोली जिल्ह्यात पोलीस कर्मचारी आहे. अशा सहा जणांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 498, 323, 504, 506 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 368/2021 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक शेख यांच्याकडे देण्यात आला आहे.
Leave a Reply