ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

 एक झुंजार व्यक्तिमत्व माजी आमदार कोम्रेड लायन कैलासवासी  हरिभाऊ विठ्ठलराव निंबाळकर

August 30, 202217:40 PM 13 0 0

3 सप्टेंबर भाऊंचा स्मृतिदिवस आहे त्यांना जाऊन बरेच वर्ष झाली त्यांना अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलं होतं त्यांच्या आठवण आली की डोळ्यापुढे सगळा इतिहासात उभा राहतो ज्येष्ठ व श्रेष्ठ अशा ध्येयवादी त्यागी तपस्वी पत्रकार माजी आमदार माजी आमदार माननीय कैलासवासी श्री हरिभाऊ निंबाळकर त्यांनी आपल्या पत्रकारितेची पत्रकारितेची सुरुवात शिव संदेश या पंक्षिकातून केली पाक्षिका नंतर त्यांनी शिव संदेश साप्ताहिक चालू केले. त्यानंतर साप्ताहिक चालू केले व त्यानंतर 23 जानेवारी 1984 पासून शिवसंदेश दैनिकाच्या स्वरूपात प्रकाशित करण्यास सुरुवात केली अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी त्यांना मिळाली अध्यक्ष पदाची यशस्वी यशस्वी कारकीर्द करण्याची छोट्या वृत्तपत्र संपादकाला संधी मिळाली तो क्षण त्यांच्या जीवनातील ऐतिहासिक क्षण होता काही विशिष्ट मूल्य व विचार समोर ठेवून आयुष्यभर सामाजिक बांधिलकीचा वसा घेतलेले फलटण तालुक्याच्या सार्वजनिक जीवनातील कृतीशील कार्यकर्ते होते वृत्तपत्र सृष्टीतील सर्वोच्च बहुमान त्यांना मिळाला होता.

सत्ता संपत्ती घराणेशाही यातून ते मोठे झाले नव्हते तर ते सामान्य माणसांचे प्रश्न हा ते घेऊनच मोठे झाले होते. सर्वसामान्यांच्या जीवनाशी भावभावनाशी एकरूप होणे हे त्यांच्या मोठेपणाचे रहस्य होते समाज हिताची तळमळ असणारे स्वातंत्र्य संग्रामातील सैनिक प्रजा परिषदेचे नेते पुरोगामी विचारांचे कृतिशील कार्यकर्ते म्हणून सर्वांना परिचित होते सर्वांना परिचित असलेले माननीय भाऊ हे खरे म्हणजे हाडाचे राजकारणी आणि तेही डावे आमदार होऊन खुर्चीचा कमिटीचा महामंडळाचा मोह त्यांना झाला नाही मोह झाला तो जेलमध्ये जाण्याचा राजकारणापेक्षा किंवा सत्तेपेक्षा सामाजिक परिवर्तनाचे काम वृत्तपत्रच करू शकेल या जाणिवेने ते या व्यवसायात पडले असावेत गुलामगिरी विरुद्ध लढण्यात ते अग्रभागी होते 1957 साली विधानसभेवर निवडून येऊन त्यांनी नवा इतिहास घडवला 1957 च्या निवडणुकीत ते महाराज श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या विरोधात विजय झाले होते. अर्थात त्यावेळची पार्श्वभूमी ही 1957 च्या संयुक्त राष्ट्राच्या चळवळीची होती तो पराभव महाराज साहेबांचा नव्हता तर तो चळवळीचा विजय होता आणि म्हणूनच माननीय भाऊ व कैलासवासी महाराजांचे संबंध जिव्हाळ्याचे राहिले होते कोणत्याही राजकीय सत्तेमध्ये नसताना सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाची प्रगती अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भूषवलेले अध्यक्ष सामान्य पत्रकारांना शासकीय सवलती पत्रकार संघाच्या इमारती उभारण्यात त्यांचे बहुमोल कार्य आहे.

ग्रामीण भागातील पत्रकारांना मुंबईमध्ये त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली दैनिक शिवसंध्येच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली शेतकऱ्यांना चांगले बियाणे पुरवणे बाबत लढा दिला फलटण येते लायन्स क्लब संस्थापन करून श्रीमंत मंडळींना गोरगरीब जनतेची सेवा करण्यास प्रोत्साहित केले महाराष्ट्रातील जकात कर्मचाऱ्यांच्या लढ्यातून मार्गदर्शन केले सफाई कामगारांच्या प्रश्नासाठी अखेर पर्यंत यशस्वी कार्य केले वृत्तपत्र सृष्टीत गेल्या दीडशे वर्षात कितीतरी बदल झाले 1832 साली बाळशास्त्री जांभेकर त्यांनी दर्पण हे पहिले मराठी वृत्त वृत्त काढले दर्पण पासून शिवसंदेश पर्यंतचा पत्रकारिता इतिहास महाराष्ट्राला अभिमान वाटावा असाच आहे. दिनांक 25 जून 1995 साली भाऊंना दर्पण पुरस्कार प्रख्यात कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते मिळाला हा सुदर्शन त्यांच्या आयुष्यातील सुवर्णशणच म्हणावा लागेल आज समाजातील सारी कार्यशक्ती सत्ता संपत्ती प्रतिष्ठा यांच्या मागे लागलेली आहे. त्यांना गोरगरीब परिस्थितीने हतबल झालेल्या बद्दल काही देणं घेणं नसतं आज आपले व्यवस्थित आहे ना मग कशाला दुसऱ्याचा विचार करावयाचा भाऊंना समाजाकडून एक उपाधी मिळाली होती. झुंजार पत्रकार ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या नगरीच्या समृद्ध मातीने ज्यांना घडविले वाढवले अशा कर्तुत्वान माणसाच्या जाण्याने शोषित उपेक्षित तसेच भाऊंच्या कुटुंबांची फार मोठी हानी झाली आहे करू भाऊंच्या स्मृतीस अभिवादन कुटुंब वसंत प्रेमळ भारी हृदयात प्रेमाचा झरा नजर करारी पदोपदी येईल आठवण सारी करू भाऊंच्या स्मृतीस अभिवादन अन्यायाची प्रकारचीड बोलणे असे सडेतोड कधी न सोडले सत्य वचन करू भाऊंच्या स्मृतीस अभिवादन नव्हते ते पोट भरू कारभारी झाले ना कधी ते भोंदू पुढारी आयुष्यभर जपले समाजकारण करू भाऊंच्या स्मृतीस अभिवादन फुले कमळ चिखला माझी तयासम अलिप्त राजकारण आदर्शाने आणि आदर्श घ्यावा कार्य असे त्यांचे महान करो भाऊंच्या स्मृतीस अभिवादन !
लता पुरुषोत्तम (राजाभाऊ) निंबाळकर

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *