ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पाच दिवसांच्या गणरायाला व गौरी माते ला भावपूर्ण निरोप

September 6, 202212:16 PM 8 0 0

उरण ( संगिता पवार ) : गणेश चतुर्थीच्या दिवशी बुधवारी पूजा केल्यानंतर पाच दिवसांच्या गणपतींना व गौरी मातेला भाविकांनी सोमवारी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. यंदा करोनाविषयक निर्बंध हटविण्यात आल्यामुळे उरण शहरातील विमला तलाव येथील विसर्जनस्थळी मिरवणुका निघाल्या. व विसर्जन करण्यात आले.

उरण नगरपरिषद च्या वतीने मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली विमला तलाव ,भवरा तलाव ,मोरा जेट्टी यथे गणेश मूर्तींना विसर्जना साठी व्यवस्था करण्यात आली होती कनिष्ठ अभियंता झुंबर माने , आरोग्य निरीक्षक हरेश तेजी ,नगर सहाय्यक रचनाकार सचिन भातुसे ,कर निरीक्षक संजय डापसे ,सर्व अधिअक्रि कर्मचारी ,नागरी साव्रक्षण दल ,चे विलासपाटील ,अनिरुद्ध अॅकॅडमी डिझास्टर मॅनेजमेन्ट चे सायंसेवक
अन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकसुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता उरण नगरपरिषद चे विमला तलाव येथे मूर्ती विसर्जन करण्यासाठी सालाबाद प्रमाणे देऊळवाडी युवक मंडळ व देऊळ वाडी ग्रामस्त यांच्या वतीने सहकार्य केले जाते.

भक्तांनी विसर्जना सोबत आणलेले निर्माल्य तलावात न टाकता त्यासाठी निर्माल्य गोळा करण्यासाठी विशेष स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे जमा झालेले निर्माल्य पासून उरण नगर परिषद खत निर्मिती करणार आहे त्याचे चांगला उपयोग होणार आहे .
मुख्याधिकारी संतोष माळी
गणेशोत्सवानिमित्त ठिकठिकाणी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर न सोमवारी पाच दिवसांच्या गणेशाला व गौरी मातेला भाविकांनी निरोप दिला. तलावांमध्ये विसर्जनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. विसर्जनस्थळाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर भक्ती भावाने वाजत -गाजत मिरवणूक काढण्यात आली होती

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *