ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

तालुक्यातील आदिवासींना मदतीचा हात

July 28, 202114:59 PM 10 0 0

उरण,ता.27(संगिता पवार) शासनाच्या खावटी योजने अंतर्गत उरण तालुक्यातील बेलवाडी सारडे, पूनाडे वाडी , जांभूळपाडा वाडी , जासई वाडी येथील कातकरी वाडी वर धान्य वाटप करण्यात आले. उपस्थित सर्व शिक्षक वर्गाने अगदी पद्धतशीर पणे सर्व आदिवासी बांधवांना धान्याचे वाटप करून त्यांची योग्य प्रकारे ऑनलाईन नोंदणी देखील करून घेतली.


यावेळी बेलवाडी सारडे कातकरी वाडी वर सामाजिक कार्यकर्ते सचिन डाउर,व उरण सामाजिक संस्था यांच्याकडून देखील धान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी चंदा नारायण वाघमारे ह्या महिलेचे घर कोसळून सर्व सांमानाची नासधूस झाल्याने ती अतिशय टेंशन मध्ये होती. परंतु उरण तालुक्यातील आदिवासी बांधवांचा आधार स्तंभ प्रा. राजेंद्र मढवी अणि संतोष पवार यांनी तिला समजावून धीर दिला. तर प्रमोद ठाकूर यांनी तिला जसे हवे तसे घर बांधून देण्याची जबाबदारी घेतली.
यावेळी मान तहसीलदारांच्या आदेशाने पंचनामा करून पुढील कार्यवाही साठी तहसील कार्यालयात पाठवला आहे.तर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,पेण वरून प्रकल्प अधिकारी देखील स्वतः सदर घटनेची तपासणी करण्यासाठी येणार असून लवकरात लवकर सदर महिलेस घर बांधून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
बेल वाडी वरील सर्व कुटुंबांना भेटण्यासाठी उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार ,,सुरक्षा रक्षकांचे कैवारी प्रमोद ठाकूर, कार्यकर्ता हर्ष पवार, खावटी योजनेचे उरण तालुका प्रमुख अप्पा सो मोरे , दत्ता पाटील ,खंडू पिचड ,भैरू जाधव, सचिन माने उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *