जालना, दि. ११(प्रतिनिधी)-जिल्ह्यातील सर्व तालुकाप्रमुख, जिल्हा परिषद सदस्य या लोकप्रतिनिधींनी लोकांच्या हिताचे व प्रलंबित असलेली विकास कामे, जिल्हाप्रमुखांकडे सुचवावी. ती आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करुन सोडवून घेण्यासाठी निश्चित प्रयत्न करु, असे विनोद घोसाळकर म्हणाले. जालना जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकींचा आढावा, शिवसेना सदस्य नोंदणी व शिवसेना नामफलकांचे अनावरण अशा विविध कार्यक्रमानिमित्त शिवसेना जिल्हा संपर्वâप्रमुख विनोद घोसाळकर हे जिल्हा दौNयावर आले असता जालना तालुक्यातील श्रीकृष्णनगर, वाघ्रुळ, पिरपिंपळगाव, बदनापूर तालुक्यातील सिंधीपिंपळगाव येथील सदस्य नोंदणी व शिवसेना नामफलक अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे, माजी आमदार संतोष सांबरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द खोतकर,भानुदास घुगे,पंडीत भुतेकर, भगवान कदम, माधवराव कदम, भाऊसाहेब घुगे,माजी जिल्हाप्रमुख बाबासाहेब इंगळे, जि.प. सदस्य वैâलास चव्हाण,बाबुराव खरात,जयप्रकाश चव्हाण, वैâलास पुंगळे,सखाराम गिराम, पांडूरंग डोगरे, भगवान अंभोरे, संतोष मोहिते, कुमार रुपवते, बाला परदेशी यांच्यासह आदींची उपस्थिती होती. पुढे बोलतांना घोसाळकर म्हणाले की, जिल्हाप्रमुख अंबेकरांनी आपल्या प्रास्ताविकात उल्लेख केलेले व जिल्हृयात अनेक दिवसांपासून रखडलेला हातवण प्रकल्प, वाघ्रुळ येथील विकास कामे, बदनापूर या तालुकास्तरावरील बसस्थानकाचे काम, बदनापूर तालुक्यातील सिंचनाचे प्रश्न, मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या यांच्या माध्यमातून मार्गी लागण्यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या निधीमधून प्रयत्न करता येतील, असेही संपर्वâप्रमुख विनोद घोसाळकर म्हणाले. जालना जिल्हा परिषद जिल्ह्यातील मतदारांनी कायम शिवसेनेच्या ताब्यात दिली. परंतु वेळोवेळी राज्यात विरोधी पक्षांचे सरकार असल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात जिल्हा परिषदेला जिल्ह्याच्या विकास कामासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळू शकला नाही. परंतु आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या असून जिल्हा परिषद कायमच शिवसेनेच्या ताब्यात ठेवणाNया जनतेस न्याय देण्याची वेळ आली असल्याचे सांगून जिल्ह्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरुन मोठ्या प्रमाणावर शिवसेना सदस्य नोंदणी मोहिम राबविण्यात येणार आहे. तसेच गाव तेथे शिवसेनेचे नामफलक लावण्यात येणार असल्याचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून मांडले. याच कार्यक्रमात माजी आमदार संतोष सांबरे, किसान सेनेचे भानुदास घुगे, युवा सेनेचे भाऊसाहेब घुगे यांचीही समयोचित भाषणे झाली. या वेळी हरिभाऊ पोहेकर, अशोक आघाव, अशोक बरडे, महेश पुरोहित, वुंâडलिक मुठ्ठे, केशव क्षिरसागर, भाउलाल पवार, हरिभाऊ शेळके, प्रभाकर घडलिंग, सर्जेराव शेवाळे, बापुराव मगर, वैजीनाथ सिरसाट, बी.टी.िंशदे, संतोष वरकड, विठ्ठलराव खरात, दत्ता खलसे, पंडीत खरात, कौतिक वाघमारे, चेतन बावणे, कडूंबा इंदलकर, निवृत्ती साबळे, संजु वाघ, ब्रम्हा वाघ, फकीरा शेख, भरत कापसे, बापुराव मगर, वैजीनाथ कावळे, सोपान कावळे, सर्जेराव गायकवाड, अजित खिल्लारे, काकासाहेब खिल्लारे, रघुनाथ शेळके, देवीदास चव्हाण, भास्कर चव्हाण, उद्धव मोरझडे, निवृत्ती सिरसाट, राजु वाडेकर, कांतीलाल लष्कर, विठ्ठल इंगळे, रामु इंगळे, माणिक खरात, भास्कर वाडेकर, गोविंदराव खांडेभराड, संतोष खरात, राधाकिसन खरात, बाळु पाचरणे, त्रिंबक तिडके, शाहु खंदारे, रमेश वाघ, संतोष वाघ, रामचंद्र वाघमारे, पंडीत खरात, गणेश खरात, बाळु खरात, मच्छिंद्र खरात, दिनकर जाधव आदींसह जि.प.सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिकांची उपस्थिती होती.
Leave a Reply