ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जमीन खरेदी करून देतो असे सांगून कोळकी येथील एक जणांची सुमारे 26 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक

April 12, 202216:38 PM 45 0 0

फलटण ( सई निंबाळकर) – मौजे कोळकी येथे जमीन खरेदी करून देतो असे सांगून एका दाम्पत्याने कोळकी येथील एक जणांची सुमारे 26 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाम्पत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 15 ऑगस्ट 2020 पासून आजअखेर बापू नामदेव शिंगाडे (रा शिंगणापूर, ता माण, जि सातारा) व त्यांची पत्नी रूपाली शिंगाडे यांनी कोऴकी येथील जमीन सर्वे नं 57/4 मधील 4.5 गुंठे जमीन खरेदी करून देतो असे सांगून फिर्यादी अभिजीत जरिचंद सुरवसे (रा.नरसोबानगर, कोऴकी,ता.फलटण, जि.सातारा) यांचा विश्वास संपादन करून वेगवेगऴ्या कारणे सांगून शिंगाडे यांने एकूण सुमारे 26 लाख 20 हजार रुपये रक्कम जमीन खरेदीकरीता व ईतर कारणाकरिता स्विकारून जमीन खरेदी करून देण्यास व पैसे परत करण्यास टाऴाटाऴ करून फिर्यादी सुरवसे यांची फसवणूक केली. जमिनीचा व्यवहार ठरल्यानंतरच्या कालावधीत जमीनीचा साठे करार फिर्यादी व त्याचे नावे करण्याचे ठरलेले असतांनाही शिंगाडे यांने एकूण 9 गुंठेचा साठेकरार हा त्याचे व त्याचे पत्नी यांचे नावे करून घेतला.
जमीन खरेदी व्यवहाराकरीता वेऴोवेऴी दिलेले एकूण सुमारे 26 लाख 20 हजार रुपये रक्कम परत करण्यास सांगितले असता त्यावेऴीही बापू शिंगाडे पैसे परत करतो असे सांगून चालढकल करू लागला. त्यामुऴे फिर्यादी यांना जमीन खरेदीसाठी दिलेल्या पैशांबाबत विश्वासघात करून फसवणूक झाल्याची बाब लक्षात आली. त्यामुऴे शिंगाडे दाम्पत्य यांच्या विरोधात फिर्यादी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण कार्यालयात तक्रारी अर्ज केला होता. तक्रारी अर्जाचे चौकशीवेऴी उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांचे कार्यालयात बापू शिंगाडे यांने दिनांक 15 फेब्रुवारी 2022 रोजीपर्यंत मुदत मागून पूर्ण पैसे परत करतो असे लिहून दिले होते.परंतु तारीख जाऊनही पैसे मागण्यास फिर्यादी गेले असता चालढकल करून पैसे देण्यास टाऴाटाऴ केल्याने फिर्यादी अभिजीत जरिचंद सुरवसे यांनी बापू नामदेव शिंगाडे व त्यांची पत्नी रूपाली शिंगाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *