ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरणमध्ये आकाश कंदीलांनी सजल्या बाजारपेठ

October 28, 202113:43 PM 78 0 0

उरण ( संगिता पवार ) : दीपावली म्हणजे अंधारा कडून प्रकाशा कडे नेणारा सण होय .दीपावलीत आकाश कांदिलास विशेष महत्व असते त्याच बरोबर फटाके , विविध आकाराचे ,विविध प्रकारचे विविध रंगाचे आकर्षक कंदील उरण बाजार पेठेत दाखल झाले आहेत विविध प्रकारचे कंदील उपलब्ध असतांना पारंपारिक काड्यांचे कंदील खरेदी करणे नागरिक पसंत करीत आहेत.


दिपावलीच्या काळात घरासह अंगण आणि परिसर उजळून प्रकाशमय करणाऱ्या आकाश कंदि लांची मागणीवाढते. पारंपारिक आकार आणि प्रकारा प्रमाणेच दरवर्षी काही नवीन प्रकार आकाशकंदीलातपहावयास मिळतात. ठरणमध्ये हंडी कंदील, पर्यावरणपूरक कंदील यांच्याप्रमाणेच छोट्याआकाराच्या कंदीलांनाही उत्तमप्रतिसाद असतो. या वर्षी बाजारात आलेले आकाशकंदीलांचे पारंपारिक आणि काही नवे प्रकार पहावयास मिळत आहेत.दीपावली हा सण येतो तोच झगमगत्या दिव्यांना सोबतीलाघेऊन. या सणात निरनिराळ्या प्रकाराच्या दिव्यांनी घरे दुकाने, गल्लीबोळ असा सगळा परिसर झगमगायला लागतो. अंगणात ,, घराबाहेर, सज्यावर लावल्या जाणाऱ्या पणत्या , दिव्यांच्या माळा या मुळे प्रत्येक घर न्हाऊन न्हाऊन निघते.कुणाच्या गॅलरीत, खिडकीबाहेरटागलेले रंगीबेरंगी आकाश कंदीलनावाचे प्रकाशनृत्य आपलीनजर खिळवून ठेवते
. आकाश कंदीलातून पडणाऱ्या या प्रकाशाने घराचे अंगणउजळून जाते…दिवाळीची रोषणाईखऱ्या अर्थाने जाणवते ती लुकलुकणाऱ्या दिव्यांच्या माळा आणि झगमगणाऱ्या आकाशकंदीलांमुळेच. हे आकाशकंदील लाकूड, थर्माकॉल,कागद, प्लास्टिक वापर करून बनवले जातात. .किमतीचे आकाश कंदील विकायला आहेत. रस्त्यावरच्या
-आकाश कंदिलांच्या स्टॉल्समुळे दिवाळीची चाहूल जाणवतेआणि तेच वेगवेगळ्या प्रकारचे,आकारांचे, रंगांचे आकाशकंदील पाहिले, की मन प्रफुल्लित होते.
उरण मध्ये उरण बाजार पेठ ,गांधी चौक ,राजपाल नाका,सेंट मेरीज हायस्कूल जवळ , आदी ठिकाणी कंदील विक्री केली जातेकंदील १० रुपया पासून दोनहजार रुपये किमतीचे कंदील बाजारात उपलब्ध आहेत .असे कंदील विक्रेते संजय म्हात्रे यांनी सांगितले .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *