ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेतेखाली कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना मिळणार अर्थसहाय्यची बैठक संपन्न

July 14, 202113:02 PM 76 0 0

जालना दि.13- जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेतेखाली दि. 12 जुलै 2021 रोजी कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना मिळणारे अथसहाय्य याबाबत बैठक संपन्न झाली. सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथील न्यायाधीशांच्या बाल न्याय समितीच्या निर्देशानुसार कोविड-19 प्रादुर्भावाच्या काळात राज्यातील बालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील बालकांना तसेच कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवुन देवून त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जालना जिल्हयात जिल्हास्तरावर कृतीदल (Task Force) समितीची तिसरी बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हास्तरीय कृतीदल (Task Force) सन्माननिय अध्यक्ष जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, सदस्य पालीस अधिक्षक विनायक देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. जालना मनुज जिंदल, जिल्हा शल्य चिक़ित्सक जालना श्रीमती अर्चना भेासले,. (प्रतिनिधी – डॉ.संदीप लहाने, श्रीमती . पाईकराव), जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना आर.बी.पारवेकर सदस्य सचिव , जिल्हा आरोग्य अधिकारी, जालना डॉ. विवेक खतगावकर, मुख्याधिकारी न.प. जालना नितिन नार्वेकर, बाल कल्याण समिती, जालना श्रीमती अश्विनी लखमले, समन्वयक जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, जालना गजानन इंगळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना सदस्य सचिव श्रीमती संगिता लोंढे यांची उपस्थिती होती.


सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती संगिता लोंढे यांनी सर्व उपस्थित सदस्यांचे स्वागत केले आणि परिचय देवुन बैठकीची सुरुवात केली. त्यानंतर जिल्हयातील कोविड-19 मुळे अनाथ झलेल्या बालकांना न्याय हक्क मिळवुन देवून त्यांचे योग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्यासाठी कृतीदला मार्फत आढावा घेण्यात आला. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कोविड मुळे एक पालक गमावलेल्या 142 बालकांचा शोध घेण्यात आला असुन बाल स्वराज पोर्टलवर माहिती भरली असल्याचे सांगीतले. दोन्ही पालक कोवीड मुळे गमावलेल्या मुळे अनाथ झालेल्या 6 बालकांचा शोध घेतला असुन बाल स्वराज पोर्टलवर माहिती भरली आहे. कोरोना मुळे एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या 136 असुन दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या 6 आहे. यापैकी एकुण 129 बालकांचा सामाजिक तपासणी अहवाल जिल्हा बाल संरक्षण कक्षा मार्फत करण्यात आला आहे. 129 पैकी बाल कल्याण समितीने 60 बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी आदेश दिलेले आहे. त्याचबरोबर कोविड व्यतिरिक्त इतर 145 बालकांचे बाल कल्याण समितीने बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी आदेश दिलेले आहे. उर्वरित 82 बालकांना लाभ देण्यासाठी कार्यवाही सुरु आहे अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी दिली. जालना जिल्हयात 6 बालकांनी कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेले आहे. यामध्ये 4 मुली व 2 मुले आहेत. या बालकांना शासन निर्णयानुसार 5.00 लक्ष रुपये फिक्स डिपॉझिट स्वरुपात मिळणार आहे. सदर रक्कम ही लाभार्थी बालक व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या संयुक्त खात्यावर डिपॉझिट स्वरुपात राहणार आहे. सदर रक्कम ही मुलीचे वय 18 वर्ष पुर्ण झाल्यानंतर व मुलाचे वय 21 वर्ष पुर्ण झाल्यानंतर त्यांना ती रक्कम मिळणार आहे. दि.17 जुन 2021 च्या शासन निर्णयानुसार जिल्हयातील 6 बालकांना या नविन योजनेतुन अर्थ सहाय्य देणे बाबत जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले.
कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मुलांची शालेय फी करिता प्राजेक्ट मुंबई या संस्थे बरोबर विभागामार्फत M.O.U. करण्यात आलेला आहे. त्याअंतर्गत एक किंवा दोन पालक गमावलेल्या बालकांच्या शाळेची फी भरुन मुलांना शैक्षणिक मदत मिळणार आहे.अशा गरजु बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये गरजु 10 बालके आढळुन आले असुन त्या बालकांचे 3 वर्षाकरिता शाळेची फिस शासनामार्फत संबंधित शाळेच्या खात्यावर भरण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त गरजु बालकांनी शाळेच्या फी बाबत मदत हवी असल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती. संगिता लोंढे यांनी केले.
कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना, नॅशनल बेनिफिट स्किम व इतर शासकीय योजनेचा लाभ देणे बाबत या कार्यालयाकडे प्राप्त यादी नुसार 41 विधवा महिलांची यादी तहसिलदार यांना देण्यात आली असून जिल्हाधिकारी यांनी याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या.
एक पालक किंवा दोन पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे संपत्तीविषयक अधिकार अबाधित रहावे याकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाबाबत समितीचे गठण करण्यात आलेले आहे. या माध्यमातुन बालकांना कायदेविषयक मदत देण्यात येईल. असे जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव आर.बी.पारवेकर यांनी सांगितले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *