जालना (प्रतिनिधी) ः जालना येथील तालुका पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश कासुळे यांच्यासह पोलीस कर्मचारी चरणसिंग सिंघल यांना 30 हजार रुपयाची लाच घेतांना लाच लुखपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले असून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येत आहे. जालना जिल्ह्या शासकीय विभागांना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली असून शासन हे दुश्शासन वाटू लागले आहे. जीथे न्यायाची अपेक्षा केली जाते तीथेच भ्रष्टाचारी अधिकार्यांमुळे अन्याय होत आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचे ग्रहण कधी सुटनार असा प्रश्न विचारला जात आहे. यापुर्वी देखील तालुका पोलीस ठाण्यासी संबंधीत प्रकरणात तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी हस्तक्षेप करुन भ्रष्टाचार केला होता. आर्थिक व्यवहार करुन पदाचा दुरुपयोग करुन सत्य घटना दडवण्याचा प्रयत्न केला होता. याचा पोलीस ठाण्यातील काही महिन्यातीलच ही दुसरी घटना असल्याने पोलीसांची प्रतिमा मलीन झाली आहे. प्रामाणिक पोलीस अधिकारी-कर्मचारी यांना सुध्दा अशा लाचखोर पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांमुळे बदनामीचा सामना करावा लागत आहे.
हेल्याच्या टक्कर प्रकरणात तालुका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश कासुळे यांनी ही लाच मागीतली होती. सुरेश कासुळे यांनी यापुर्वी कोण कोणत्या गुन्ह्यातील आरोपींना पैसे घेऊन मदत केली होती काय याचाही तपास होणे गरजेचे आहे. अशा भ्रष्ट अधिकार्यांमुळे गोरगरीबांवर अन्याय होत असून हा अन्याय दुर करण्यासाठी पोलीस अधिक्षक काय भुमीका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तक्रारी प्रलंबीत ठेवून भ्रष्टाचाराला घातले जाते खतपाणी
अनेक पोलीस ठाण्यात सर्वसामान्याच्या तक्रारी शक्यतो नोंदवून घेतल्या जात नाहीत, साहेबांना विचारा, ते आल्यावर या असे सल्ले ठाणे आंमलदार देत असल्याने अनेकांनी अनुभवले आहे. एखादी तक्रार घेतलीच तर तीला चौकशीवर ठेवले जाते, त्यांनतर आरोपीची पहिली भेट घेतली किंवा बोलने झाले की तक्रारीला ब्रेक लावला जातो, फिर्यादीने तक्रारीचे काय झाले याची विचारणा केली तर तक्रार चौकशीवर आहे असे सांगून टाळले जाते, परंतु तक्रार प्रलंबीत ठेवून भ्रष्टाचाराला खतपाणी घालन्याचे काम होत असल्याचे काम अधिकारी करीत असल्याचे बोलल्या जात आहे.
वेळीच दखल घेतली असती तर खून झाला नसता…
गेल्या वर्षी म्हणजेच 11 जानेवारी 2020 रोजी मध्यरात्रीच्या वेळी मंठा रोडवर एका उद्योजकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ही हत्या होण्यापुर्वी सदरील उद्योजकाने तालुका पोलीस ठाण्यात एनसी दाखल करुन जिवीतास धोका असल्याचे म्हटले होते, परंतु त्यांच्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहिले नाही किंवा त्यांच्या तक्रारीला देखील भ्रष्टाचार करुन कार्यवाही केली नाही. त्यामुळेच एका उद्योजकाची हत्या झाली होती. जर पोलीसांनी वेळीच दखल घेतली असती तर त्या वेळी उद्योजकाचा खून झाला नसता अशी चर्चा सुरु आहे. किमान आता तरी पोलीस प्रशासनाने वेळीच धखल घेऊन कार्यवाही करावी अन्यथा भ्रष्टाचारामुळे अजुनही घातपात होतील अशी भिती आहे. पोलीस अधिक्षक यांची दिशाभुल करुन स्थानिक अधिकारी खोटी माहिती वरीष्ठ अधिकार्यांना देत असल्याचीही चर्चा सुरु आहे.
Leave a Reply