ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

बी एस एफ मधून निवृत्त झालेल्या जवानाची पाटनेवाडी फलटण येथे ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक

April 21, 202216:34 PM 38 0 0

सातारा हिरकणी (विदया निकाळजे) : 1999 च्या कारगिल युद्धापासून देशसेवेची प्रेरणा घेऊन बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजेच बी एस एफ मध्ये भरती झालेल्या पाटणे वाडी ,पोस्ट खुंटे येथील श्री नंदकुमार सोपान बोरावके हे नुकतेच सैन्य सेवेतून निवृत्त झाले. त्यांच्या सैन्य सेवेतील यशस्वी कारकीर्दीनंतर त्यांचे सैन्य दलातील सेवानिवृत्त मित्र श्री सुनिल काटकर आणि राजेंद्र टकले, श्री अनिल टकले, माजी सैनिक श्री संदिप पवार, श्री किरण तोरस्कर, श्री रवींद्र तोरस्कर, श्री ज्योतिराम पवार,दत्तात्रय पवार, श्री विजय बोरावके, श्री गणेश पिसाळ, शिंदेवाडी चे सरपंच श्री अमित शिंदे,श्री किशोर पिसाळ, श्री निखिल बोरावके, माजी सरपंच उषाताई बोरावके, श्री ऋषिकेश पवार,पाटणे वाडीचे पोलिस पाटील श्री प्रीतम शिंदे,श्री गणेश काळे, श्री संतोष पवार, श्री सोमनाथ यादव,श्री बाळू घाडगे,श्री तात्यासाहेब बर्गे,अनिकेत पवार,प्रशांत जगताप, श्री अमोल भोसले यांनी त्यांची सजवलेल्या गाडीतून आणि भारतमाता की जय, वंदे मातरम च्या जयघोषात भव्य मिरवणूक काढली.
त्यांच्या देश सेवेदरम्यान त्यांचे आई – वडील ,पत्नी आणि परिवारातील सदस्यांनी मोलाचे सहकार्य केल्यानेच ते यशस्वीपणे सैन्यातील सेवा करू शकले असे मत यावेळी श्री बोरावके यांनी व्यक्त केले.
मिरवणूकीस आजी माजी सैनिक ,परिसरातील ग्रामस्थ ,मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *