मी रोजच्या प्रमाणेच घरातील काम आटपत होते..तेवढयात मिस्टरांना सुट्टी असल्याकारणाने त्यांनी मला आपण फिरायला जायचं का ? अस विचारल …मग मी त्यांना विचारले अत्ता अचानक कुठे जायचं? मग त्यांनी ‘सौताडा’ हे नाव घेतल ,त्यावेळेस माझ्या मनात अनेक प्रश्न येऊ लागले कुठे आहे हा सौताडा आणि कसा आहे ?पण तरीही लघभघीन आम्ही फिरायला जाण्यासाठी तयार झालोत . बीड जिल्हातील पाटोदा तालुकयापासुन १७ km अंतरावर असलेल्या सौताडास आम्ही चारचाकी ने गेलो. तेथे गेल्यावर सर्वत्र हिरवळच हिरवळ दिसू लागली …मनपरिवर्तन करणारी ही हिरवळ पाहुन मला खुप आनंद झाला . आम्ही पुढे निघालो पाहतो तर काय भला मोठा असा धबधबा … आम्ही सप्टेंबर महिन्यात गेलो होतो .त्यामुळे धबधब्याला खुप पाणी वाढलेलं होत.मी माझ्या आयुष्यात पाहिलेला तो पहिला धबधबा होता .धबधब्यातुन पडणारे पांढरेशुभ्र पाणी माझ्या मनाला भुरळ पाडत होते .५०० फुटाच्या अंतरावर खोल दरीत धबधब्याचे पाणी पडत होते व तेथेच झाडाझुडपात रंगीबेरंगी असे रंग दिलेले रामेश्वर नावाचे मंदीर वसले होते .

अत्ता मला ओढ लागली होती ती म्हणजे मंदीराची ,खाली दरीत मंदीराजवळ जाण्यासाठी ४००-५०० पाय-या आहेत त्या उतरत उतरत आम्ही खाली पोहोचलो . धबधब्याचे खाली पडलेले पाणी पूढे वाहत नागमोडी वळण घेत होते .
गारगोटी सारखी दिसणारी ,आकाराने गोल असलेली वेगवेगळी दगडे जणू काय मला बघा म्हणत होती , स्वच्छ अशा नितळ पाण्यातुन ती उठून दिसत होती, मधोमध वेगवेगळया प्रकारची हिरवीगार झाडी होती , डोळयाने टिपून घ्यावी अशी द्रृश्य होती . आणि म्हणुनच आम्ही तेथे मोबाइल मध्ये फोटोशूट केले मग आम्ही मंदिराकडे वळालो …असे म्हणतात की राम ,लक्ष्मण,सिता हे वणवासात असताना याठिकाणी आले होते . सितेला तहाण लागली म्हणुन प्रभू श्री राम यांनी ज्या ठिकाणी बाण मारला होता , आज त्या ठिकाणी रामेश्वर धबधबा आहे.मंदिराच्या आतमध्ये राम ,लक्ष्मण ,सिता यांच्या सुंदर मुरत्या व तसेच वाळुने बनवलेली महादेवाची पिंड आहे. सौताडा हे पीकनीक पांइट असल्याने पावसाळयात पाणी पाहण्यासाठी लोकांची वर्दळ असते. आम्ही देवदर्शन करुन पाय-या चढत वरती आलोत . तेथुन उजव्या बाजुला बगीच्या आहे तेथेही आम्ही फोटोशूट केलं आणि संध्याकाळ झाली म्हणुन घराकडे निघालो . घरी आल्यानंतर रात्री झोपताना मला हे सर्व दृश्य आठवत होते,कारण मला भावलेले ते प्रेक्षणीय स्थळ होते ….!
– रेश्मा धरणीधर कोळेकर
Leave a Reply