ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सच्चा शिवभक्त

October 1, 202114:07 PM 78 0 12

शिवभक्त कोण असतो?
अरे शिवभक्त तो असतो,
ज्याच्या हृदयात महारांजाबद्दल
सच्चा आदर असतो
प्रत्येक स्त्रीचा सन्मान करणारा
म्हणजे सच्चा शिवभक्त होय.

कोण म्हणते? राजे,फक्त मराठ्यांचे आहेत
राजे तर सर्वांचेच आहेत.
राजेंसारख जातीभेद ,धर्मभेद,वर्णभेद
कोणताच भेद न करणारा
म्हणजे सच्चा शिवभक्त होय.

राष्ट्राच्या संरक्षणासाठी भारत-पाक
सीमेवर लढणारे जवान
व राष्ट्राच्या हितासाठी
सतत झिजनारा देशभक्त
म्हणजे सच्चा शिवभक्त होय.

शिवरायांसारखे मातेची सेवा करणारा
आणि आज्ञा पाळणारा
व शंभूराजां सारखं वडिलांचा
आदर- सन्मान करणारा
म्हणजेच सच्चा शिवभक्त होय.

अरे, कपाळावर चंद्रकोर लावून
डोक्यावर फेटा बांधून
चेहऱ्यावर दाढी राखणारा नाही, तर
शिवछत्रपतींचे गुण अंगीकारणारा
म्हणजेच सच्चा शिवभक्त होय.

शिवजयंतीत भगवे कपडे घालून
मिरवनारा नाही तर,
शिवरायांचे आचार, विचार
आचरणात आणणारा
म्हणजेच सच्चा शिवभक्त होय.

परसत्तेसमोर कधीही न झूकणारा
शिवरायांचा मावळा
फक्त महाराजांना व शंभूराजांना
मानाचा मुजरा करणारा
म्हणजेच सच्चा शिवभक्त होय.
कवी
कु कावेरी दिगांबर जेटेवाड
मु पो बरबडा ता नायगाव जि नांदेड
पिन 431602
मोबाईल नंबर:- 9503234929
7517906378

Categories: कविता, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *