ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

दर्जेदार व गुणवत्तापुर्ण काम करण्याची आ. कैलास गोरंट्याल यांची सुचना

September 23, 202115:18 PM 53 0 0

जालना (प्रतिनिधी) :  मंमादेवी मंदीर मस्तगड ते रेल्वे स्टेशन या रस्त्याच्या सिमेंटीकरणाच्या कामांस सुरुवात करण्यात आली असून या रस्त्याचे काम दर्जेदार होईल याकडे लक्ष द्यावे अशी सुचना आ. कैलास गोरंट्याल यांनी केली आहे.


आ. कैलाश गोरट्याल यांनी राज्य शासनाकडुन वैशिष्टपुर्ण योजने अंतर्गत मंजुर करण्यात आलेल्या या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ काही दिवसांपुर्वीच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या शुभहस्ते व जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, आ. कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा सौ. संगिताताई गोरंट्याल, युवा नेते अक्षय गोरंट्याल यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. सदर रस्त्याच्या कामाला नुकतीच सुरुवात करण्यात आली असून रस्त्याचे काम करतांना कुठलीही कुचराई सहन केली जाणार नाही असे स्पष्ट करत सदर रस्त्याचे काम दर्जेदार व गुणवत्तापुर्ण करण्याच्या सुचना आ. गोरंट्याल यांनी दिल्या आहेत. येणार्‍या कालावधीत वैशिष्टपुर्ण योजने अंतर्गत राज्य शासनाकडुन मंजूरी मिळालेल्या रेल्वे स्टेशन ते पित्ती पेट्रोल पंपापर्यंत या रस्त्याच्या सिंमेटी करणाचे काम देखील लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे आ. कैलास गोरंट्याल यांनी सांगितले.
सदर काम दर्जेदार करून घेण्यासाठी प्रभागाचे नगरसेवक महावीर ढक्का यांनी सदर कामावर विशेष लक्ष ठेवले असून नगर परिषदेचे अभियंता सय्यद सउद, नगरसेवक विष्णु पाचफुले, नगरसेवक अशोक पवार, नगरसेवक सय्यद आरेफ, अशोक पाटोळे यांनी रस्त्याच्या कामाला नुकतीच भेट दिली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *