उरण (संगिता पवार )पनवेल तालुक्यातील पोयंजे येथे आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्या ने महसूल विभाग पनवेल यांच्या वतीने महा स्वराज्य अभियाना अंतर्गत आधार कार्ड शिबिराचे आयोजन रा.जि ,प .शाळा पोयंजे येथे सोमवार (दि. १८ ) रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पर्यंत ठेवण्यात आले . .शिबिराचे आयोजक भारतीय जनता पार्टी गुळसुंदें ,जि .प पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे सहकार्य मिळाले .
या शिबिरात नवीन आधारकार्ड काढणे ,आधार कार्ड दुरुस्ती करणे ,आधार कार्ड मोबाईल नंबर सोबत लिंक करणे आदी कामे करण्यात आली .,या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला . या वेळी भाजपा पोयंजे पंचायत समिती अध्यक्ष प्रवीण ठाकूर भाजपा गुळसुंदे जि. प .अध्यक्ष आशाताई मस्कर , ग्रुप ग्रामपंचायत पोयंजे सदस्य मंदार चोरघे , ग्रुप ग्रामपंचायत पोयंजे सदस्य रोहिदास चोरघे, भाजपा पोयंजे अध्यक्ष अशोक भोईर ,,,तानाजी खंडागळे ,अंगणवाडी सेविका पोयंजे जयश्री चोरघे , दिपक भोईर ,कल्पेश गायकर ,,केशव ठाकूर ,प्रदीप ठाकूर ,मंडळ अधिकारी पोयंजे प्रभाकर नाईक ,तलाठी पोयंजे रुपाली नाखवा ,कोतवाल पोयंजे प्रकाश पडवळ ,आदी मान्यवर व ग्रामस्त उपस्थित होते .
Leave a Reply