जालना (प्रतिनिधी) ः आम आदमी पार्टी जालना नगर पालीकेच्या सर्व जागा लढविणार असून जालनेकरांना नवा पर्याय उपलब्ध करुन देणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून मिळून मिसळून वाटाघाटी करुन जनतेची लुट आणि नागरी सेवा देण्यापासून वंचित ठेवलेल्या जनतेला सर्व सुख-सोई उपलब्ध करुन देण्यासाठी आम आदमी पार्टी निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे असे आम आदमी पार्टीचे संजोग हिवाळे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. जालना शहरातील नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच जनतेला न्याय मिळवूण देण्यासाठी आम आदमी पार्टीने कंबर कसली असून येणार्या नगर पालीका निवडणूकीत सर्वच्या सर्व प्रभागात उमेदवार उभा करुन स्वबळावर निवडणूका लढविल्या जाणार असल्याचेही संजोग हिवाळे यांनी म्हटले. नगर पालीकेच्या निवडणूकीसाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांची चाचपणी सुरु असून इच्छुकांसाठी गुगल फॉर्म भरुन मागविण्यात येत आहे. प्राप्त अर्जातून मुलाखती घेऊन दोन ते तिन महिने आधीच उमेदवार जाहिर केले जाणार आहे.
जालना शहरातील नागरीक विविध स्वरुपाचा कर भरतात, नागरी सेवा आणि सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कर भरला जातो. परंतु या कराचा दुरोपयोग करुन तो सत्ताधारी पक्षाचे लोक हे स्वतःचे खिसे भरण्यासाठी करीत आहेत. केंद्र आणि राज्य सरकार विकास कामासाठी निधी उपलब्ध करुन देतात, या निधीचा योग्य आणि उत्कृष्ठ दर्जाचे काम करण्यासाठी वापर झाला असता तर दिल्ली प्रमाणे नगर पालीकेच्या शाळा आणि रस्ते सुधारले असते. आरोग्य केंद्र, पाण्याची व्यवस्था चांगली झाली असती. काही लोकांनी तर जालना शहरातील आरोग्य केंद्र हरवल्याची तक्रार दाखल केली आहे ही बाब नगर पालीका आणि राज्याचे आरोग्यमंत्री यांचा अपमान करणारी आहे. तरीही त्यात काही सुधारणा झाली असे वाटत नाही.
यावेळी आम आदमी पार्टीने मागील दिड वर्षापासून जालना शहरात दलालमुक्त अभियान राबविण्यास सुुरुवात केली. त्या माध्यमातुन जनतेची होणारी लुट थांबवली. या अभियानामार्फत शासकीय शुल्क वगळता हजारो प्रमाणपत्रे मोफत देण्यात आली. यापुर्वीही शैक्षणीक क्षेत्रात पालकांची आर्थीक लुट करणार्यांना वठणीवर आणन होणारी पिळवणूक बंद केली. त्याच बरोबर आरोग्य क्षेत्रातील भ्रष्ट्राचार उघडकीस आणून त्यांच्यावर प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडले. जनतेने गुन्हेगारी पार्श्वभुमीच्या लोकांना निवडून न देता जनहितार्थ कामे करणार्यांना संधी द्यावी, आगामी नगर पालीकेच्या निवडणूकीत आम आदमी पार्टीच्या उमेदवारांनाच निवडून द्यावे असे आवाहन संजोग हिवाळे यांनी केले.
Leave a Reply