जालना (प्रतिनिधी) ः येथील दैनिक लोकप्रश्न व हा मराठवाडा लोकप्रश्नचे दबंग संपादक अभयकुमार बलीराम यादव यांची हिंदू वाहिनीच्या महाराष्ट्र प्रदेश मिडीया प्रभारी पदी निवड करण्यात आली आहे.
सदरील नियुक्ती ही संस्थापक अध्यक्ष अतुल मिश्रा यांच्या आदेशावरून राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. शितल अग्निहोत्री यांनी केली आहे. संघटनेचे धैय – धोरण सामन्य जानतेपर्यंत पोहचविण्याचे काम एकनिष्ठ राहुन करावे असे नियुक्ती पत्रात नमुद केले आहे. राज्याचे मिडीया प्रभारी झाल्याबद्दल त्यांचे राजेश व्यास, लक्ष्मण डाले, विठ्ठल ठोबंरे, सुनील सोनवणे, ज्ञानेश्वर मानवतकर, गजानन सोनवणे, सचिन गवळी, संतोष भुतेकर, राजेश राउत, अजय तलरेजा, अजय चौधरी आदींनी अभिनंदन केले.
Leave a Reply