जालना ( प्रतिनिधी) : युवा सेनेच्या जालना उपतालुका प्रमुख पदी नूतन वाडी येथील धडाडीचे ,सक्रिय युवासैनिक अभिजीत भगवान साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना नेते ,माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या भाग्यनगर येथील संपर्क कार्यालयात रविवारी ( ता.24) युवासेना राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर यांनी जिल्हा युवा सेनेची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत अभिजीत साळवे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, जिल्हा समन्वयक अंकुश पाचफुले,उपजिल्हा प्रमुख अमोल ठाकुर, तालुकाप्रमुख गणेश मोहिते , घाणेवाडी चे ग्रामपंचायत सदस्य रवी लोखंडे ,अजय लोखंडे यांची उपस्थिती होती. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा सेना प्रमुख ना.आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना नेते, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर ,जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, ए. जे.बोराडे यांच्या सूचनेनुसार युवासेना उपतालुका प्रमुख पदी आपली नियुक्ती करण्यात आली असून पदाच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुखांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवून संघटन अधिक बळकट करावे. असे त्यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात युवासेना राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर, जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे, तालुकाप्रमुख गणेश मोहिते यांनी नमूद केले असून या नियुक्तीबद्दल अभिजीत साळवे यांचे युवा सेना पदाधिकारी, जि. प .पं.स.ग्रामपंचायत सदस्य व युवा सैनिकांनी अभिनंदन केले आहे.
Leave a Reply