ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अभिष्टचिंतन सोहळा  माझ्या  मोठ्या मनाच्या राजाचा

July 25, 202118:19 PM 149 0 1

उरण ( संगीता ढेरे ) जीवनप्रवासात आयुष्य जगत असतांना ह्या सुंदर भूतलावर आपण जन्माला आलो याचा आनंदोत्सव म्हणून जन्मदिवस साजरे होतात आणि होतच राहतील  पण काही व्यक्तीमत्व अशी असतात ज्यांचे जन्मदिवस फक्त स्वतः पुरताच आनंदोत्सव साजरा करण्या करीताच करत नाहीत तर  आपला जन्मदिवस साजरा होतांना ..दुसऱ्याच्यां जीवनात आनंद कसा निर्माण करेल ह्याच भावनेतून साजरे केले जातात  आज ज्यांचा  अभिष्टचिंतन सोहळा  साजरा झाला आहे ते व्यक्तीमत्व म्हणजे  उरण, पनवेल,पेण तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात अपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून ज्यांनी समाज्यात आपलं वेगळंच स्थान निर्माण केलं आहे सोबतच पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनात आपलं अनमोल योगदान देत खऱ्या अर्थानं  निसर्गप्रेमी वन्यजीवं प्रेमी म्हणून नावारूपाला आलेलं व्यक्तिमत्व  अर्थात  केअर ऑफ़ नेचर सा.संस्थेचे संस्थापक  रायगड भूषण  सन्माननीय. श्री राजू मुंबईकर साहेब या दिलखुलास , दिलदार व्यक्तीमत्वाचा आणि सारडे विकास मंचचे खजिनदार श्री रोशन जी पाटील* या दोन व्यक्तीमत्वाचां आज अभिष्टचिंतन सोहळा आजचा दिवस खऱ्या अर्थाने अनेक समाजपयोगी कार्यांच्यां पर्वणीचाच दिवस म्हटलं तर वावगं ठरणारं नाही !खास करून ह्या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात ते दूर दुर्गम डोंगर दाऱ्यांतं,वाडी वस्तीवर राहणारे माझे आदिवासी बांधव  ज्यांच्या करीता आजचा दिवस  सपनोकीं सौगात घेऊन येत असतो  आणि ह्या वर्षीच्या जन्मदिनी  त्यांच्यां करीता खास अशी भेंट मिळाली ती त्यांचा वाडी वस्तीवरचा खडतर असणारां दळणवळणाचा मार्ग श्री राजू मुंबईकर  यांच्या माध्यमातून सुखकर झाला म्हणजे रोजच्या प्रवासाकरीता उपयोगात येणारा चांगला योग्य रस्ता तयार झाला  तो म्हणजे  उरण रानसई येथील आदिवासी वाडीवरील तब्बल १७० मीटर लांबीचा संपूर्ण रस्ता स्वखर्चातून …सिमेंट काँक्रीटनं अगदी भक्कम पध्दतीनं बांधून तयार करण्यात आला.

सोबतच उरण वेश्वी  येथील एकविरा देवी मंदिर डोंगरावर वड, पिंपळ, करंज* अश्या प्रकारातील तब्बल २५० झाडांची* लागवड करत  वृक्षारोपण करण्यात आलं आणि त्या डोंगर माथ्यावरील  निर्जीव शिल्पांवर  सुंदर प्राणी, पक्षांची चित्रे काढून दगडांना बोलकं करतं  रॉक अॅनिमल पार्क बनवलं त्या निसर्गरम्य ठिकाणीे येणार्या पर्यटकांना निवांत क्षणी बसण्याकरिता  सिमेंट खुर्च्या ( बेंच )* बसविण्यात आल्या  सोबतच सारडे येथील  कोमनादेवी ऑक्सिजन पार्क मध्ये  वड पिंपळ,काजू,फणस,बाहावा  या प्रकारातील  तब्बल ५० झाडांची  लागवड करून  त्या पार्क मधील झाडांच्या सभोवताली वाढणाऱ्या गवताची सफाई करण्या करीता  औषध फवारणी करण्याचा  फोरस्ट्रोक पेट्रोलइंजिन पंप  आणि सोबत  १५० मीटर रबर पाईप हा  गोल्डन ज्युबली मित्र मंडळ सारडे आणि सारडे विकास मंच  ह्या सामाजिक मंडळांना निसर्ग संवर्धनाच्या कार्याकरीता *श्री राजू मुंबईकर  यांच्या तर्फे वाढदिवसा निमित्त सुंदर भेंट स्वरूपात देण्यात आली.
त्याच सोबत श्री राजू मुंबईकर साहेब  आणि  श्री रोशन पाटील* यांच्या जन्मदिना निमित्त ह्या संवेदनशील मनाच्या आणि दिलदार स्वभावाच्या दोन महानुभवांनीं  एक हृदयस्पर्शी कार्य केलं ते म्हणजे  कोकणांतील पूरग्रस्त बांधावा करीता तब्बल ५,०००/ ( पाच हजार ) रुपयांचा  मदतनिधी  हा  समाजसेविकासौ.संगिता ताई ढेरे मॅडम  यांच्या कडे ऑनलाईन सुपूर्द केला त्याच सोबत आदिवासी बांधवांनां काही तरी गोड धोडं मिळावं त्यांचा पण आनंद द्विगुणित व्हावा म्हणून   सामाजिक कार्यकर्त्या  सौ.संगीता ताई ढेरे मॅडम यांच्या औदार्यातून  राजू मुंबईकर यांना त्यांच्या जन्मदिना निमित्त  सस्नेह भेंट म्हणून तब्बल १०,००० ( दहा हजार ) रिअल फ्रेश फ्रुट ज्युसची पाकीटं ( तब्बल २५ टन वजन)देण्यात आली  आणि ह्याच  फ्रेश फ्रुट ज्युसचं वाटप  उरण रानसई येथील  चांदायले वाडी खैरकाठी, भुऱ्याची वाडी, मार्गाची वाडी, खोंड्याची वाडी, बंगल्याची वाडी, सागाची वाडी आणि  पुनाडे आदिवासी वाडी, वेश्वी आदिवासी वाडी, जांभूळपाडा आदिवासी वाडी  या आदिवासी वाड्यांवरील अबाल वृद्ध आदिवासी बांधवांना  रिअल फ्रेश फ्रुट ज्युसच्यां हजारों पाकिटांच वाटप करण्यात आले.
ह्या अभिष्टचिंतन सोहळ्या प्रसंगी  वृक्षारोपण आणि  रस्त्याच्या अनावरण* कार्यक्रमा प्रसंगी  पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते  सन्माननीय  श्री प्रितम दादा म्हात्रे साहेब  यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि ह्या सुंदर अश्या कार्यक्रमाला यायचं भाग्य लाभलं आणि येथे आल्यावर रॉक अॅनिमल पार्कचं नामफळक अनावरण करताना अगदी लक्ख ऊन होतं  आणि   लगेजच बाजूलाच जेव्हा  वृक्षारोपण  करायला गेलो तेव्हा एवढा जोरदार पाऊस सुरु झाला कि हा निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल कि रिबन कापताना लक्ख ऊन आणि वृक्षलागवड करताना धुवांधार पाऊस म्हणजे निसर्ग सुद्धा ह्या निसर्गप्रेमी व्यक्तीमत्वाच्यां कार्यात आपल्या अंतरंगाची उधळण करत हजर राहिला  आणि ह्या भर पावसात छत्र्या सोबत असतांना देखील त्या न घेता स्वतः भिजत वृक्षारोपण करून आपलं निसर्गाप्रति प्रेम दर्शविलं ते  सन्माननीय श्री प्रितम दादा म्हात्रे आणि ह्या सर्व मंडळींनं सोबतच  रानसई येथे रस्ता अनावरण सोहळ्या प्रसंगी श्री साई देवस्थान वहाळचे संस्थापक सन्माननीय *श्री रविशेठ दादा पाटील साहेब हे आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि राजू मुंबईकर यांचा जन्मदिवस म्हणजे ह्या आदिवासी बांधवांकरीता एक आनंदाची पर्वणीच असते  त्यांच्या कडून ह्या आदिवासी बांधावाना काही तरी चांगल्याच कार्याची अपेक्षा असतो आणि त्यांची ती अपेक्षा नक्कीच *राजू मुंबईकर* पूर्ण करतं असतात  ह्या वर्षी ह्या आदिवासी बांधवांचा खडतर प्रवास सुखकर व्हावा म्हणून  १७० मीटरचा सिमेंट काँक्रीटचा रस्ता* तयार करून त्या बांधावाकरीता एक अनोखी भेंट दिली .आणि  तिथे कार्यक्रमास उपस्थित सर्व रोटरीयन पदाधिकाऱ्यांना संबोधून म्हटले कि एक रोटरीयन म्हणून काम करताना राजू मुंबईकर हे फक्त शहरांपुरतं मर्यादित न राहता ह्या दूर-दुर्गम डोंगर- दाऱ्यांत राहणाऱ्या आदिवासी बांधवां करीता एक आशेचा किरण बनून सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि या पुढे आपण सर्वांनी पण पुढाकार घेत ह्या बांधावांनां अद्याप जास्ती सुखसोयी कश्या देता येतील या लक्ष दिलं पाहिजे.
ह्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती दर्शविली ती पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेता सन्माननीय श्री प्रितम दादा म्हात्रे साहेब, श्री साई देवस्थान साईनगर वहाळचे संस्थापक  सन्माननीय  श्री रविशेठ दादा पाटील साहेब,वेश्वी ग्रामपंचायतीचे सरपंच  श्री सुनिल कातकरी साहेब , रोटरी क्लब ऑफ़ उलवे नोड अध्यक्ष  शिरीष जी कडू साहेब , सौ.पार्वती ताई पाटील,राणी ताई मुंबईकर, माधुरी ताई गोसावी,श्री संदेश जी घरत,श्री सुनिल जी वर्तक, श्री विलास जी ठाकूर, नितेश मुंबईकर,श्री नवनीत जी पाटील,श्री हिराचंद जी म्हात्रे, श्री अनिल जी घरत,श्री संपेश जी पाटील ,श्री कांतीलाल जी म्हात्रे,श्री वैभव जी पाटील, अनुज जी पाटील आणि  रोटरी क्लब ऑफ़ उलवेनोडचे सर्व रोटरीयन पदाधिकारी आणि वाड्यांवरील आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या ह्या पर्यावरणपूरक आणि आदिवासी बांधवांकरीता जणू आनंदोत्सवच म्हणून साजरा झालेला हा कार्यक्रम अगदी मोठ्या उत्साहात आणि उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *