ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जालना शहरात सुमारे 22 कोटी रूपये खर्चुन करण्यात येणाऱ्या रस्त्यांची कामे प्रगतीपथावर उर्वरीत रस्त्यांच्या कामासाठी मिळणार 21 कोटीचा निधी : आ. गोरंट्याल

October 10, 202114:07 PM 19 0 0

जालना (प्रतिनिधी) ः जालना शहरात सुमारे 22 कोटी रूपये खर्चुन करण्यात येत असलेल्या रस्ते विकासाची कामे प्रगती पथावर असून येणाऱ्या पंधरा दिवसात आणखी 20 ते 21 कोटी रूपयांच्या निधीतून शहरातील उर्वरीत रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहे. या रस्ते विकास कामांमुळे जालना शहराच्या वैभवात निश्‍चितपणे भर पडेल असा विश्‍वास आ. कैलास गोरंट्याल यांनी येथे बोलतांना व्यक्त केला आहे. राज्य शासनाकडून मंजुर करण्यात आलेल्या वैशिष्ट पुर्ण योजनेअंतर्गत 22 कोटी रूपयांच्या निधीतून जालना नगर पालिकेतर्फे शहरातील विविध भागात रस्त्यांच्या सिमेंटीकरणाची कामे सुरू करण्यात आली असून प्रगती पथावर असलेल्या या कामांना आज शनिवारी सायंकाळी आ. कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल, युवानेते अक्षय गोरंट्याल, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, अभियंता सय्यद सउद आदींनी भेटी देत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.


यावेळी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधतांना आ. कैलास गोरंट्याल म्हणाले की, बाबुराव काळे चौक ते जवाहरबाग पोलीस ठाणे, गोपीनाथ मुंढे चौक ते किराणा दुकान या रस्त्याच्या कामाला आपण भेट दिली असून सदर काम दर्जेदार पध्दतीने सुरू आहे. बाबुराव काळे चौक-सेंटमेरी हायस्कुल ते कन्हैयानगर या रस्त्याबाबत मोंढ्यातील व्यापाऱ्यांनी अडचणी मांडल्या. या रस्त्याच्या कामाची निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तयार असून या कामाला देखील लवकरच जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात येणार असल्याचे सांगुन आ. गोरंट्याल म्हणाले की, मस्तगड ते रेल्वेस्टेशन या रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे काम देखील प्रगतीपथावर आहे. शिवाजी पुतळा ते सिव्हील क्लब, शिवाजी पुतळा ते जिजामाता प्रवेशद्वार या रस्त्याच्या कामाला देखील लवकरच सुरूवात करण्यात येणार आहे. गोल्डन जुब्ली रोड, बुंदीले चौक ते जलशुध्दीकरण केंद्र, जुना जालना भागातील राख हॉस्पीटल जवळील तीन रस्त्यांच्या कामाला येत्या काही दिवसात सुरूवात करण्यात येणार आहे. रेल्वे स्टेशन ते पित्ती पेट्रोलपंप या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून एकुण 22 कोटी रूपये खर्चुन करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामाला शहरात सुरूवात करण्यात आलेली आहे. याशिवाय 11 कोटी खर्चुन करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामाला येत्या 15 दिवसात प्रारंभ केला जाणार आहे. शिवाय जिल्हा नियोजन समितीकडून 7 कोटी, नगरोत्थान योजनेअंतर्गत 5 कोटी, दलितोत्तर योजनेअंतर्गत 2 कोटी आणि दलित वस्ती विकास योजनेअंतर्गत 13 कोटी असा एकुण 20 ते 21 कोटी रूपयांचा निधी लवकरच जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या माध्यमातून शहरातील रस्ते विकासासाठी उपलब्ध होणार असून या निधीच्या माध्यमातून शहरातील उर्वरीत रस्त्यांची विकास कामे हाती घेतली जाणार आहे. एकुणच या रस्त्यांच्या कामांमुळे शहर विकासाला गती मिळणार असून सर्वसामान्य जनतेची रहदारीची अडचण दुर होण्यास मदत होणार असल्याचा विश्‍वास आ. कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केला आहे.
शहराच्या चौफेर विकासाला प्राधान्य दिले : सौ. संगीताताई गोरंट्याल
जालना शहरातील जनतेने नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राज्यात ऐतिहासीक मताधिक्याने विजयी करून आपल्यावर जो विश्‍वास टाकला होता. त्या विश्‍वासाला सार्थ ठरत गेल्या पाच वर्षात आपण जालना शहरातील विकासाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला असल्याचे नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल यांनी सांगितले. शहरातील रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, लाईट, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण अशा सर्वच नागरी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण गेल्या पाच वर्षात सातत्याने प्रयत्न केला आहे. विकास कामांसह मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या माध्यमातून जालना शहराच्या विकासाला आ. कैलास गोरंट्याल यांच्या मार्गदर्शनाखाली प्राधान्य दिल्याचे नगराध्यक्षा सौ. गोरंट्याल यांनी सांगीतले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *