ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आबांच्या अकस्मित जाण्याने रायगड जिल्हा काँग्रेसची कधीही न भरून येणारी हानी झाली

July 30, 202118:30 PM 26 0 0

उरण प्रतींनिधी (अश्विनी निलेश धोत्रे) : महाड पोलादपूर मतदारसंघाचे माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे उपाध्यक्ष व रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष.माणिकराव जगताप साहेब (आबा) यांचे 26जुलै रोजी आकस्मित निधन झाले.आज उरण तालुका, उरण शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल व सर्व सेल यांच्या विद्यमाने उरण काँग्रेस भवन येथे श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.यावेळी काँग्रेस नेते व कामगार नेते श्री. महेंद्र घरत प्रमुख म्हणून उपस्थित होते.


त्यांनी आबांना श्रद्धांजली वाहताना सांगितले कि सदैव हसत मुख असणारा चेहरा आपल्यात नाही यावर आज हि विश्वास बसत नाही. रायगड जिल्हा काँग्रेस ला खऱ्या अर्थाने उभारी देण्यात आबांचा खुप मोठा वाटा आहे. आबा नेहमी कार्यकर्त्यांशी आपुलकीने वागले, प्रशासनावर आबांची चांगली पकड होती. आबांच वक्तृत्व खुपच ऐकण्या सारखं होत.त्यांची वाणी खुप सुंदर होती .त्यांच व्यक्तीमत्व सर्वांना आवडणार होत. त्यांच्या जाण्याने रायगड जिल्हा काँग्रेसची कधीही न भरून येणारी खुप मोठी हानी झाली आहे.तळागाळातील कार्यकर्त्यांशी नाळ जोडलेल्या या नेत्याला माझ्या कडून माझ्या परिवाराकडून, काँग्रेस पक्षाकडून व इंटक परिवाराकडून मी भावपुर्ण श्रद्धांजली वाहत आहे.
या वेळी रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष. मिलिंदजी पाडगावकर,जिल्हा परिषद सद्स्य. बाजीराव परदेशी, उरण तालुका महिला अध्यक्षा. सौ. रेखा घरत, उरण शहर अध्यक्ष. श्री. किरिट पाटील, अखलाक शिलोत्री,सरचिटणीस, महेंद्र ठाकूर, निलेश मर्चंडे, जणुशेठ भोईर, आदिनी आपले मनोगत व्यक्त करून आबांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी उरण तालुका काँग्रेस चे अध्यक्ष. श्री जे डी जोशी, सेवादल अध्यक्ष. श्री कमलाकर घरत, उरण तालुका इंटक अध्यक्ष. श्री संजय ठाकूर, रायगड जिल्हा महिला अध्यक्ष सौ. संध्या ठाकूर, जयवंती गोंधळी, सदानंद पाटील, अविनाश पाटील, घनश्याम पाटील,जयवंत पाटील, प्रकाश पाटील, भालचंद्र घरत,विनोद पाटील, उमेश ठाकूर,उरण विधानसभा युवक उपाध्यक्ष श्री.लंकेश ठाकूर सरचिटणीस
विवेक म्हात्रे, आदित्य घरत, प्रेमनाथ ठाकूर, अंगत ठाकूर, अजित ठाकूर, अमोल ठाकूर व मोठया संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *