ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

काँग्रेस पक्ष डिजिटल सदस्य नोंदणी मोहिम अधिक गतीमान करा : ओझा

March 11, 202215:42 PM 32 0 0

जालना (प्रतिनिधी) : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर काँग्रेस पक्ष डिजिटल सदस्य नोंदणी मोहिम राबविण्यात येते आहे. मार्च महिण्याच्या शेवटपर्यंत ही नोंदणी असल्यामुळे जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अधिक गतीमान करून मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करावी असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा जिल्हा प्रभारी रामकिशन ओझा यांनी केले आहे.
राज्यामध्ये प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष डिजिटल पक्ष सदस्य नोंदणी मोहिम राबविण्यात येते आहे. अलिकडे औरंगाबाद येथे विभागीय पातळीवर पक्ष नोंदणी मोहिमेबद्दल सविस्तर मार्गदर्शन आणि सुचना देण्यात आल्या आहेत. परंतू जिल्ह्यामध्ये पक्ष नोंदणी मोहिम गतीमान झाल्याचे दिसून आले नाही. नोंदणीचा अवधी थोडा उरल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्ष नोंदणी मोहिम अधिक गतीमान करून मोठ्या प्रमाणात नोंदणी करावी असे आवाहन श्री ओझा यांनी केले आहे.
ही मोहिम यशस्वी करण्यासाठी लवकरच जिल्हा पातळीवर व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आ. कैलास गोरंट्याल, आ. राजेश राठोड आदी मान्यवर मार्गदर्शन करणार असल्याचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी सांगीतले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *